पीकविम्यापासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:08 PM2020-01-11T23:08:13+5:302020-01-12T01:21:01+5:30
येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मानोरी : येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी पीकविमा कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
ज्या शेतकºयांनी पीकविमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळाली आहे. मात्र, ज्या शेतकºयांनी विमा काढलेला आहे अशा शेतकºयांना कंपन्यांकडून हातात एक रु पयादेखील मिळाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकºयांनी मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. त्यात मक्यावर लष्करी अळीने आक्र मक केल्याने शेतकरी संकटात सापडले होते. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून वाचवलेल्या पिकावर अवकाळी पावसाने घाला घातला. त्यामुळे शेतकºयांचा हजारो रु पयांचा खर्च पाण्यात गेला. शासनाकडून भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र विमा कंपनीकडून मात्र, विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, पीकविमा कंपन्यांकडून शेतकरी हिताचासाठी कोनतेही पाऊल उचलले जात नसून, आगामी काळात पीकविमा काढावा की नाही, असा प्रश्नही शेतकरी एकमेकांना विचारताना दिसत आहेत. तर शासनाच्या संबंधित विभागाने पीकविमा काढणाºया कंपनींवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून,
लवकरच भरपाई देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपासून रुपयाही पदरी नाही
येवला तालुक्यात २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडल्याने मका पीक पाण्याअभावी वाया गेले होते. तेव्हाही अनेक शेतकºयांनी पीकविमा काढला होता. तसेच २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे प्रचंड नुकसान केले. शेतकºयांनी विमा उतरवलेला असतानाही पीकविमा कंपन्यांकडून दोन वर्षांपासून शेतकºयांच्या पदरी एक रुपयाही पडला नाही.