शेतकरी संपाने पालेभाज्यांची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:12 PM2018-06-02T16:12:49+5:302018-06-02T16:12:49+5:30
शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम मालवाहतूकीवर जाणवला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन ३५ ते ४० वाहने भरून भाजीपाला रवाना होत असतो मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना केल्या जाणाºया पालेभाज्या मालाची ५० टक्के निर्यात घटली आहे.
नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी येणा-या शेतमालाची आवक दुस-या दिवशीही घटलेली आहे. शनिवारी दुपारी बाजारसमितीत शुक्रवारपेक्षा 15 ते 20 टक्के मालाची आवक वाढली असल्याचे बाजारसमिती सुत्रांनी सांगितले. परंतु कमी आवकेमुळे भाजीपाल्याचे भाव तेजीतच आहेत.
दरम्यान, शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम मालवाहतूकीवर जाणवला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन ३५ ते ४० वाहने भरून भाजीपाला रवाना होत असतो मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना केल्या जाणाºया पालेभाज्या मालाची ५० टक्के निर्यात घटली आहे. नाशिक बाजारसमितीत सर्वच पालेभाज्या व्यवहार सुरळीत असल्याने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. शेतमाल कमी प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. शनिवारी दुपारी शेतमालाची १५ ते २० टक्के आवक तर वाढली शिवाय बाजारभाव २५ ते ३० टक्के वाढल्याने शेतक-यांनी आणलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाल्याची भावना शेतक-नी व्यक्त केली. दरम्यान शनिवारी बाजारसमितीतील व्यवहार बंद असल्याची अफवा पसरल्याने दिंडोरी तालुक्यातून शेतमालाची विशेष आवक झाली नाही.