बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:22 PM2020-06-02T22:22:05+5:302020-06-03T00:07:51+5:30

एकलहरे : लॉकडाउनच्या काळात शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अनेक शेतकºयांना आपला माल कवडीमोल दरात विकावा लागला. त्यात त्यांचा वाहतूक खर्चही सुटला नाही.

Farmers in dire straits due to falling market prices | बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल

बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल

Next

एकलहरे : लॉकडाउनच्या काळात शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अनेक शेतकºयांना आपला माल कवडीमोल दरात विकावा लागला. त्यात त्यांचा वाहतूक खर्चही सुटला नाही. शेतकºयांचे अतोनात हाल झाले. अशा परिस्थितीत कुटुंब जगवायचे कसे, याची भ्रांत भेडसावत असताना हिंगणवेढे येथील २० जणांचे एकत्र कुटुंब असलेल्या धात्रक परिवाराने या संकटावर मात करीत यातून मार्ग काढला.
हिंगणवेढे येथील शेतकरी निवृत्ती धात्रक यांचे साहेबराव, बाळू, वसंत व संपत आणि त्यांची बायका, मुले मिळून २० जणांचे कुटुंब एकत्रितपणे मळ्यात राहातात. कोरोनाच्या भयंकर संकटाशी सामना करताना त्यांनी ९१ वर्षीय वडिलांच्या सल्ल्याने शेतकामांचे, भाजीपाला विक्रीचे व कुटुंबाच्या खर्चाचे योग्य नियोजन केले. कुटुंबातील सर्व सदस्यांना मास्क वापरून, फिजिकल डिस्टन्स ठेवून काम करण्याच्या सूचना चिरंजीव साहेबराव यांनी दिल्या.
त्यांनी टमाटे, कोबी, कांदे यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र ऐन पिके काढणीच्या वेळेस लॉकडाउन लागू झाला. दरम्यान साहेबराव यांना खासगी कंपन्यांचा आधार मिळाला. शेतमाल चितेगाव फाट्यावरील कंपनीच्या मॉलपर्यंत पोहोचविला. मात्र दर कमी मिळाला. निराश न होता धात्रक कुटुंबाने जिद्दीने कोरोनाचा मुकाबला करत एक आदर्श घडवून दिला आहे. आपल्या शेतमाल विकण्याचे कसब दाखविले.
कोरोनाच्या ऐन संकट काळात शेतात टमाटे, कोबी, कांदे एकाच वेळी काढणीस आले. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच होत असल्याने घरातील सर्वच लहान-मोठे कामाला लागले.
---------------------------
शेतकरी कुटुंबातील सर्वच लागले कामाला
४ संचारबंदी, मार्केटबंदी, पोलिसांचा खडा पहारा, कोरोना रुग्णांची वाढती
संख्या अशा बिकट परिस्थितीला सामोरे जात शेतकºयांनी आपल्या कुटुंबाची मदत घेतली. धात्रक परिवारानेही न डगमगता भाजीपाला खासगी कंपनीला पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य कामाला लागले.
---------------------
कोणतीही परिस्थिती जास्त काळ थांबून राहत नाही. प्लेगची साथ आली तेव्हा लस नव्हती. आता कोरोनाची साथ आली, त्यावरही लस शोधण्याचे काम सुरू आहे. हेही दिवस निघून जातील. परिस्थितीचा धिराने व संयमाने सामना करणे एवढेच आपल्या हातात असते.
- निवृत्ती धात्रक, शेतकरी हिंगणवेढे
--------------------------
सुरु वातीला टमाट्याला दहा रु पये प्रतिकिलो, तर कोबीला पाच रु पये प्रतिनग दर मिळाला. कंपनीचे टार्गेट पूर्ण झाल्यावर माल घेणे बंद केले. मार्केट सुरू झाल्यावर शिल्लक माल नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा येथे विकून मिळेल तो दर पदरात पाडून घेतला. टमाटे, कोबी संपल्यानंतर आम्ही कांदा विक्र ीचे नियोजन केले.
- साहेबराव धात्रक, शेतकरी

Web Title: Farmers in dire straits due to falling market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक