उमराणेत निघेल तेवढा कांदा विक्रीवर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 10:20 PM2019-12-06T22:20:35+5:302019-12-07T00:32:23+5:30
चालू वर्षी परतीचा पाऊस व सततच्या रोगट हवामानामुळे लाल कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडण्याची व रोटर मारण्याच्या मन:स्थितीत असलेले शेतकरी गेल्या आठवड्यापासून कांदा बाजारभावात तेजी असल्याचे बघून किमान केलेला खर्च तरी वसूल व्हावा या अपेक्षेपोटी दहा किलोपासून एक क्विंटलपर्यंत जेवढा निघेल तेवढा कांदा बाजारात विक्र ी करताना दिसत आहेत.
उमराणे : चालू वर्षी परतीचा पाऊस व सततच्या रोगट हवामानामुळे लाल कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडण्याची व रोटर मारण्याच्या मन:स्थितीत असलेले शेतकरी गेल्या आठवड्यापासून कांदा बाजारभावात तेजी असल्याचे बघून किमान केलेला खर्च तरी वसूल व्हावा या अपेक्षेपोटी दहा किलोपासून एक क्विंटलपर्यंत जेवढा निघेल तेवढा कांदा बाजारात विक्र ी करताना दिसत आहेत.
कांदा कमी प्रमाणात असल्याने शेतकरी सायकल, मोटारसायकलवर कांदे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. चालू आठवड्यात उन्हाळ व लाल कांद्याच्या आवकेत कमालीची घट आल्याने कांद्याची मागणी वाढली आहे. परिणामी उन्हाळ कांद्याचे दर १४ हजार रु पये तर लाल कांद्याचे दर १० हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सोडून दिलेल्या कांद्याच्या शेतात शेतकरी कांदे काढताना दिसत असून, काही प्रमाणात निघालेले कांदे क्रेट व गोण्यांमध्ये टाकून मोटारसायकलवर विक्रीसाठी आणत असल्याने येथील बाजार समितीत किरकोळ कांदा विक्रेते शेतकºयांची संख्या जवळपास पाचशेपर्यंत पोहोचली होती. दरम्यान किरकोळ विक्रीसाठी आलेल्या कांद्याची प्रतवारी कमालीची घसरली असल्याने त्यांना किमान दोन हजार ते पाच हजार रु पये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत आहे.
कांदा व्यापाºयांत घबराटीचे वातावरण असले तरी मागणी कायम असल्याने बाजारभाव स्थिर असून, सकाळच्या सत्रात येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे दर कमीतकमी ५ हजार रु पये, जास्तीत जास्त १३ हजार ८०० रुपये, तर सरासरी दर १० हजार रु पयांपर्यंत होते. तसेच लाल कांद्याचे दर कमीतकमी २ हजार रु पये, जास्तीत जास्त ९ हजार ४०० रु पये, तर सरासरी सहा हजार रु पये प्रतिक्विंटलपर्यंत दर होते.