शेतकऱ्यांनाे संकटांचा सामना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:19 AM2021-02-17T04:19:00+5:302021-02-17T04:19:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : शेतकरी कुटुंबांची अवस्था बिकट आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शेतकरी कुटुंबांची अवस्था बिकट आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांची मुले नाेकरीसाठी संघर्ष करत आहेत. अनेक संकटांशी झुंजणारा शेतकरी अखेर हताश हाेऊन आत्महत्या करताे. शेतकऱ्यांनाे कितीही संकटे येऊ द्या, न डगमगता त्यांचा सामना करा. आत्महत्येसारखा दुबळा विचार मनात आणू नका, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी केले.
तालुक्यातील दहिदी येथे शेतकरी व पाेलीस पाटील मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी डाॅ. दिघावकर बाेलत हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण देवरे हाेते. पाेलीस ठाण्यात येणाऱ्या महिला व शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. महिलांना पाेलीस ठाणे माहेरघर वाटायला हवे. शासन यंत्रणा जाेपर्यंत लाेकाभिमुख हाेत नाही, ताेपर्यंत कितीही कायदे करा, परिपत्रके काढा त्याचा काहीही उपयाेग हाेणार नसल्याने दिघावकर म्हणाले. शेतकऱ्याचा अवमान करणाऱ्या एका पाेलीस अधिकाऱ्याची एक वर्षाची पगारवाढ राेखण्याची कारवाई केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ३२ टाेळ्यांना जेरबंद करत दाेन काेटींची रक्कम परत मिळवून दिल्याचे दिघावकर यांनी सांगितले. यावेळी अरुण देवरे, खेमराज काेर, शेतकरी रमेश कचवे यांनीही मनाेगत व्यक्त केले. या मेळाव्याला पाेलीस उपअधीक्षक लता दाेंदे, प्रदीप जाधव, कृषी अधिकारी गाेकुळ आहिरे, किशाेर इंगळे, गुलाबराव पाटील, पृथ्वीराज शिंदे, पाेलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बच्छाव, केवळ हिरे आदी उपस्थित हाेते.