नैसर्र्गिक आपत्तीत पिचतोय शेतकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 04:51 PM2020-08-26T16:51:01+5:302020-08-26T16:51:33+5:30
सायखेडा : नैसर्गिक संकटे येत असल्याने या संकटात शेतकरी होळपळत असुन सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सायखेडा : नैसर्गिक संकटे येत असल्याने या संकटात शेतकरी होळपळत असुन सध्या शेती व्यवसाय तोट्याचा होत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या जगाच्या पोशींद्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असताना पावसाच्या अनियमीत पणामुळे कधी दुष्काळ तर कधी ओला काळ पडत असल्यामुळे खर्चाएवढे उपन्न निघत नसल्याने कर्जाचा डोंगर दिवसें दिवस वाढतच चालला आहे. शासनाची कर्ज माफि योजना रखडल्यामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकामधुन पिक कर्ज वाटप बंद झाले आहे. सावकाराकडुन व्याजाने पैसे काढुन शेती करायची, तोंडाशी आलेला घास दुष्काळ, अतीवृष्टी, ओला दुष्काळामुळे हिसकावला जात आहे. पिक विमा योजना नावालाच उरल्यामुळे दुष्काळात नुकसान मोठ्या प्रमाणात होवूनही पिक विम्या पासुन शेतकरी वंचीत राहत आहेत. पिक विमा कंपनीचे निकष दरवर्षी बदलत असल्याने पिक विमा मिळण्याची जिल्हयातील शेतकऱ्यांची आशा मावळताना दिसत आहे. राज्यात गेल्या चार पाच वर्षापासुन पावसाळा कमी प्रमाणात होत असल्यामुळे शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जुन, जुलै महिन्यात पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती मात्र आॅगष्टच्या दुसºया आठवडयापासुन पावसाळा चांगल्या प्रमाणात सुरु वात झाल्यामुळे कुठे अतिवृष्टीमुळे उभे पिके पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे पुन्हा हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्या जात असल्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.
शेतकºयांप्रती आस्था दाखवत शेतीविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करु न त्या योजना शेतकºयापर्यत पोहचायला हव्यात. शासकीय यंत्रणेमुळे शेतीची झालेली नूकसान भरपायीसाठी स्पॉट पाहणी करु न मदत मिळण्यासाठी वरिष्ठाकडे वेळीच पाठपुरावा करावा. आधीच निसर्ग आपत्तीने पिचलेल्या शेतकºयांना शासनाने तरी मदतीचा हात द्यावा हीच माफक अपेक्षा शेतकºयांमधुन व्यक्त होत आहे.