पुरणगावी आज शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:47 AM2018-03-14T00:47:06+5:302018-03-14T00:47:06+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे अकरा महिने आणि अकरा दिवस सीताराम नामाचा घोष आणि तुलसीदास रामायणाचे वाचन सुरू असून, त्याची बुधवारी (दि़१४) सांगता होणार आहे़

Farmer's Fair today in Surat | पुरणगावी आज शेतकरी मेळावा

पुरणगावी आज शेतकरी मेळावा

Next
ठळक मुद्दे तुलसी रामायणाची सांगता सांगता बाळकृष्ण महाराज गंगापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे अकरा महिने आणि अकरा दिवस सीताराम नामाचा घोष आणि तुलसीदास रामायणाचे वाचन सुरू असून, त्याची बुधवारी (दि़१४) सांगता होणार आहे़
दरम्यान, सकाळी ११ वाजता या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़ गेली नऊ दिवस बाळकृष्ण महाराज मोगल गंगापूरकर यांनी तुलसीदास रामायण कथा सादर केली. त्याचप्रमाणे नऊ कुंडीय होम करण्यात आला़ या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सीताराम भक्तपरिवार यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता बुधवारी (दि.१४) बाळकृष्ण महाराज गंगापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे़
या कार्यक्र मासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत. परिसरारातील भाविकांनी संत दर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़

Web Title: Farmer's Fair today in Surat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक