पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Published: October 26, 2016 12:23 AM2016-10-26T00:23:59+5:302016-10-26T00:25:34+5:30

काळी दिवाळी : ...अन्यथा मंत्र्यांसमोर आंदोलन

Farmers' fasting for peak crops | पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

पीककर्जासाठी शेतकऱ्यांचे उपोषण

Next

नाशिक : पीक कर्जापासून वंचित राहिलेल्या एक लाख शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी नाशिक जिल्हा विविध विकास सेवा सहकारी सोसायटी संघटना व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी विविध माध्यमांतून प्रयत्न केले, परंतु त्यांना दाद मिळत नसल्याने उपोषण आंदोलन करावे लागले. जिल्हा बॅँकेने पीक कर्जाचे वाटप ३० सप्टेंबरपर्यंत तर द्राक्ष उत्पादकांना ३० डिसेंबरपर्यंत कर्जाचे वाटप करणे क्रमप्राप्त असताना प्रत्यक्षात जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप होऊ शकलेले नाही. यासंदर्भात पालकमंत्री, सहकारमंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला, परंतु आश्वासनापलीकडे काहीच पदरी पडू शकले नाही. सध्या शेतकऱ्यांना द्राक्षबागेचे छाटणीचे काम, डीपिंग, फवारे व औषधासाठी कर्जाची अत्यंत आवश्यकता असून, कर्ज मिळत नसल्याने सावकाराकडून शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून नियमित कर्जफेड करणारे शेतकरी दुसऱ्या बॅँकेकडे निघून गेले तर सोसायट्या अडचणीत येतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे अन्यथा राज्य व केंद्रातील मंत्र्यांसमोर शेतकरी आंदोलन करतील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या आंदोलनात विष्णुपंत गायखे, राजू देसले, सुरेश रायते, संपतराव वक्ते, मधुकर शिंदे, राजाराम रायते, मनोहर देवरे, पोपट राजोळे, सचिन खालकर, निवृत्ती धनवटे, भास्करराव शिंदे, बाबुजी खैरे, अशोक जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers' fasting for peak crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.