सटाण्यात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:50 AM2018-08-28T01:50:35+5:302018-08-28T01:51:31+5:30

तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पामधील पूरपाणी सुकड नाल्यात टाकावे या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारपासून (दि.२७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

 Farmers fasting for water | सटाण्यात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी उपोषण

सटाण्यात शेतकऱ्यांचे पाण्यासाठी उपोषण

googlenewsNext

सटाणा : तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पामधील पूरपाणी सुकड नाल्यात टाकावे या मागणीसाठी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारपासून (दि.२७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.  दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी उपोषणकर्त्यांना सकाळी कार्यालयाच्या आवारात मंडप टाकण्यास मज्जाव करून उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तणाव निर्माण झाल्याने अधिकाºयांना माघार घ्यावी लागली.  पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने वनोली, औंदाणे, तरसाळी, सटाणा परिसरातील शेती पाण्याअभावी संकटात सापडली आहे. शेतीबरोबरच शेतशिवारात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पतून वाहून जाणारे पूरपाणी सुकडनाल्यात टाकावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उदासीन दिसून येत आहेत. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारपासून (दि. २७) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर प्रहारचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे.  उपोषणकर्त्यांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तुषार खैरनार, पंचायत समितीचे माजी सभापती चिला निकम, सुधाकर पाटील, महेंद्र खैरनार, दीपक रौंदळ, हेमंत निकम, नीलेश निकम, महेश निकम, शरद चव्हाण, भालचंद्र अहिरे, मयूर निकम, कपिल सोनवणे, दौलत निकम, प्रवीण पवार, कैलास निकम यांचा समावेश आहे. वीरगाव लाभक्षेत्रातील शेतकरी राकेश देवरे, उद्धव देवरे, शिवाजी देवरे आदी शेतकºयांनी पूरपाणी टाकण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. उपोषणकर्त्या शेतकºयांची मागणी दसाणे लघुप्रकल्प अंतर्गत असलेल्या वीरगाव फड कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील असल्याने हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे जलसंपदा विभागच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले .
शाब्दिक चकमक
सकाळी उपोषणकर्ते खैरनार यांनी आवारात मंडप टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी मंडप टाकण्यास विरोध केला. यावेळी उपोषणकर्ते व अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अधिकाºयांना अखेर नमते घ्यावे लागले.

Web Title:  Farmers fasting for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.