हवामान बदलाची शेतकऱ्यांना भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:32 PM2020-02-02T22:32:07+5:302020-02-03T00:25:53+5:30

येवला तालुक्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग आलेला असताना थंडीतदेखील चांगली वाढ झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिके बहरली होती. मात्र, रविवारी (दि.२) अचानक वातावरण पुन्हा बदलले. सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांनी पिके जाण्याचा धसका घेतला असून, विविध प्रकारच्या औषध फवारणीवर जोर दिला आहे.

Farmers fear climate change | हवामान बदलाची शेतकऱ्यांना भीती

हवामान बदलाची शेतकऱ्यांना भीती

googlenewsNext
ठळक मुद्देचिंता : येवला तालुक्यात हरभरा उत्पादनात घट होण्याची शक्यता

मानोरी : येवला तालुक्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग आलेला असताना थंडीतदेखील चांगली वाढ झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिके बहरली होती. मात्र, रविवारी (दि.२) अचानक वातावरण पुन्हा बदलले. सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्यांनी पिके जाण्याचा धसका घेतला असून, विविध प्रकारच्या औषध फवारणीवर जोर दिला आहे.
रविवारी दिवसभर अनेक ठिकाणी शेतकरी उन्हाळ कांदा लागवडीवर, गव्हावर तसेच हरभरा पिकावर औषध फवारणी करीत असल्याचे दिसून आले. सततच्या औषध फवारणीमुळे खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. मात्र, उत्पादन हाती आल्यानंतर हमीभाव मिळेल की नाही याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा मुबलक पाणी आणि बाजारात टिकून असलेले कांद्याचे दर शेतकºयांच्या चांगल्या प्रकारे जिव्हारी लागले असून, यंदा विक्र मी उन्हाळ कांद्याची लागवड केली जात आहे. दरवर्षी पाण्याची टंचाई उद्भवत असल्याने डिसेंबर महिना अखेरपर्यंत उन्हाळ कांदा लागवड बोटावर मोजण्या इतक्याच शेतकºयांकडून केली जात होती. यंदा मात्र समाधानकारक पाऊस आणि त्यात आॅक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने पाणीटंचाई दूर झाली आहे.
यंदा कांद्याचे दरदेखील गगनाला भिडल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात महागड्या दराने कांद्याची रोपे घेऊन उन्हाळ कांदा लागवड केली असून, अद्यापही पुढील पंधरा दिवस उन्हाळ कांदा लागवड सुरू राहणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. खरीप हंगामातील पिकापासून ते रब्बी हंगामातील पिकापर्यंत यंदाचे वातावरण हे शेतकºयांना डोकेदुखी आणि दैनंदिन व्यवहारात आर्थिक गणित कोलमडणारा ठरला आहे. खरीप हंगामातील पिके अवकाळी पावसाने वाहून गेल्यानंतर एक रु पयाचेदेखील उत्पादन शेतकºयांच्या पदरी पडलेले नसल्याने झालेला खर्चदेखील फिटला नसल्याने त्यात रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने ढगाळ वातावरण, धुके, दवबिंदू अशा वातावरणातील बदलांमुळे बळीराजा औषध फवारणीने त्रस्त झाला आहे. दरम्यान, मानोरी बुद्रुक, देशमाने, मुखेड, जळगाव नेऊर आदी परिसरात गव्हाच्या उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गहू पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव
अनेक ठिकाणी गव्हाच्या पिकांना ओंब्या लागल्या आहे, परंतु ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी माव्याचा प्रादुर्भाव झाल्याने गहू पिकावर याचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे मात्र मुबलक पाण्यामुळे यंदा हरभरा पिकाची लागवड कमी प्रमाणात झाली आहे. अनेक ठिकाणी हरभरा पिकाला फुलकळ्या लागण्यास सुरु वात झाली असली तरी ढगाळ वातावरणामुळे मात्र या फुलकळ्या धोक्यात आल्या आहेत. रोगट वातावरणामुळे हरभºयाच्या झाडांवर अळीचे प्रमाण वाढत चालल्याने हरभरा पीक धोक्यात आले आहे.

Web Title: Farmers fear climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.