बाजार समित्या बंदमुळे शेतकरी आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:38 AM2020-10-29T00:38:48+5:302020-10-29T00:39:17+5:30
जळगाव नेऊर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे पदरात पडत असताना केंद्र शासनाने कांदा दरवाढीला आला घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्ब़ध घातले असून, या निर्ब़धानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ दोन टन कांदा साठवता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विक्री करत आहे .
जळगाव नेऊर : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे पदरात पडत असताना केंद्र शासनाने कांदा दरवाढीला
आला घालण्यासाठी कांद्याच्या साठवणुकीवर निर्ब़ध घातले असून, या निर्ब़धानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ दोन टन कांदा साठवता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा विक्री करत आहे .
शासनाने सप्टेंबरला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे परतीच्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या कांदा पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. आणि पुन्हा आता कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात राहावे
यासाठी केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंंध घातले असले तरी याचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असुन कांदा लागवडीपासुन विचार केल्यास कांद्याला जवळपास वर्षभराचा कालावधी होत असून कांदा सडण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे ,त्यातच बाजार समित्या बंद झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच गुदमरत असून त्याचा फायदा मात्र व्यापारी वर्गाला होत आहे, कारण सध्या बाजारांमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला, साठवुण ठेवलेला कांदा बाजारपेठेत जात असल्याने व्यापाऱ्यांच्या मालाला भाव भेटत आहे तर शेतकऱ्यांचा कांदा हा चाळीतच गुदमरून सडत आहे.
दिवसेंदिवस कांदा खराब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची चाळणी करून खराब कांदा बाहेर काढला आहेत त्यामुळे चाळणी केलेला कांदा जास्त दिवस टिकत नसल्याने शेतकऱ्यांना लवकर कांदा विकावा लागणार आहे परंतु बाजार समित्या बंद असल्याने ऐन सणासुदीला बाजार समित्या बंद झाल्याने शेतकऱ्यांना भांडवलाच्या चिंते बरोबरच रब्बी पिके उभी करण्यासाठी भांडवलाची चिंता भेडसावत आहे.