शेतातील पांदण रस्त्यांसाठी शेतकरी एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:18 AM2021-06-16T04:18:06+5:302021-06-16T04:18:06+5:30
तालुक्यातील विजयनगर (देवळवाडी) येथे वामन उखा सागर यांच्या शेतापासून ते अभिला रतन निकम यांच्या शेतापर्यंत असलेला पांदण रस्ता अरूंद ...
तालुक्यातील विजयनगर (देवळवाडी) येथे वामन उखा सागर यांच्या शेतापासून ते अभिला रतन निकम यांच्या शेतापर्यंत असलेला पांदण रस्ता अरूंद होता. त्यापुढील ५०० मीटर अंतर जाण्यासाठी रस्ता नसल्याने वाहन शेतापर्यंत जात नव्हते. तेथील शेतकरी शेतमाल रस्त्यापर्यंत डोक्यावरून वाहून आणत. यामुळे हे शेतकरी त्रस्त झाले होते. ही बाब उपसरपंच शरद सागर यांनी सुनील आहेर यांच्या लक्षात आणून दिली असता त्या परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांची दिनांक ११ जून रोजी बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून सामंजस्याने मार्ग काढण्याचे आवाहन केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी शेतातून रस्ता देण्यास संमती दिली. त्यामुळे गेल्या ५० वर्षांपासून रेंगाळलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला. शनिवारी (दि. १२) सदर रस्ता कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर, उपसरपंच शरद सागर, साहेबराव निकम, समाधान सागर, बापू सागर, श्याम सागर, बाजीराव दोधा, भास्कर सागर, प्रभाकर निकम, अजय निकम, भिला रतन, मनोहर सागर, विश्राम निकम, योगेश निकम, प्रवीण निकम, नीलेश सूर्यवंशी, प्रदीप निकम, सतीश सागर, गोविंद निकम आदी शेतकरी उपस्थित होते.
इन्फो
शेतकऱ्यांची गैरसोय दूर
वाखारी गटात खर्डा, वार्शी, वाखारवाडी, मुलुखवाडी, वाखारी आदी गावातील शेतकऱ्यांमधील रस्त्यासंबंधी असलेले वादविवाद दूर करून त्यांना एकत्र आणले. शासकीय मदतीची वाट न पाहता स्वखर्चाने जेसीबी मशीन उपलब्ध करून देत पांदण रस्ता दुरुस्तीची कामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांचा दीर्घ काळापासून रेंगाळलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून मोठी गैरसोय दूर झाली आहे.
कोट...
शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता हा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. परंतु वादविवादामुळे रस्त्यांचे प्रश्न मार्गी न लागता सर्वांचीच गैरसोय होते. वाखारी गटात २०८ पांदण रस्त्यांचे सर्वेक्षण केले असून, शासकीय मदतीची वाट न पाहता हे सर्व पांदण रस्ते दुरूस्त करण्याचा पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे १५ पांदण रस्त्यांची दुरुस्ती केली आहे. शेतकऱ्यांचे असेच सहकार्य लाभले तर लवकरच हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण करू.
- सुनील आहेर, तालुकाध्यक्ष, रायुकाँ
फोटो- १४ पांदण रोड
पांदण रस्ता दुरूस्तीचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर, समवेत सुनील आहेर व शेतकरी.
===Photopath===
140621\14nsk_14_14062021_13.jpg
===Caption===
फोटो- १४ पांदण रोड पांदण रस्ता दुरूस्तीचा शुभारंभ करतांना जि.प. सदस्या नूतन आहेर, समवेत सुनिल आहेर व शेतकरी