दापूर येथे शेकऱ्यांना कृषीकन्यांकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:49 PM2018-10-04T17:49:33+5:302018-10-04T17:49:47+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बियाण्यांचे प्रकार याविषयी माहिती सांगितली.

Farmers' guidance from Shankars to Dapoor | दापूर येथे शेकऱ्यांना कृषीकन्यांकडून मार्गदर्शन

दापूर येथे शेकऱ्यांना कृषीकन्यांकडून मार्गदर्शन

Next

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथे कृषीकन्यांनी शेतकºयांसाठी विविध शेतीविषयक प्रात्याक्षिके दाखविली. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकºयांना बियाण्यांचे प्रकार याविषयी माहिती सांगितली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सेवा संस्कार संस्थेचे कृषी महाविद्यालय मालदाड येथील कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उपक्रम राबविण्यात आला. सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्यांनी शेतकºयांना विविध जातीच्या बियाण्यांचे प्रकार व आकार याविषयी माहिती व प्रात्यक्षिक शेतकºयांना दिली. बियाण्यांचे प्रकार व आकार यावरून बियाणे कोणते व कोणत्या प्रतीचे आहे हे कसे ओळखावे बियाणे उगवण्याची क्षमता याविषयी माहिती दिली.
यावेळी सायली गिते, हर्षदा सानप, दीप्ती थेटे, भाग्यशाला शिरसाट, मयूरी होले, पूनम काळे यांच्यासह कचरू आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, गोविंद केदार, विजय केदार, सोमनाथ आव्हाड, दत्तू आव्हाड, पांडुरंग आव्हाड आदिंंसह शेतकरी उपस्थित होते. या कृषीकन्यांना विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरवींद हारदे, प्राध्यापक सुरेखा घुले, वैभव साबळे, अ‍े. वाय. सहाणे, अर्जुन साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Farmers' guidance from Shankars to Dapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी