एकरभर कांदा लागवडीसाठी शेतकऱ्याला मोजावे लागतात ८५०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:47+5:302021-08-24T04:19:47+5:30
चौकट- तालुकानिहाय कांदा लागवड मालेगाव- १२४७, सटाणा - ११००, नांदगाव - २१०, कळवण - ४१, देवळा- ५५, सिन्नर-१८८.८०, ...
चौकट-
तालुकानिहाय कांदा लागवड
मालेगाव- १२४७, सटाणा - ११००, नांदगाव - २१०, कळवण - ४१, देवळा- ५५, सिन्नर-१८८.८०, येवला - २५०, चांदवड- ५१७.
चौकट-
मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र, यावर्षी दरात फारशी वाढ झाली नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे आता हा कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने अनेक ठिकाणी प्रतवारी करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कोट-
यंदा कांद्याचा सर्वत्र मुबलक साठा आहे. शासनानेही यावर्षी पुरेपूर काळजी घेतल्यामुळे कांदा दरात वाढ होण्याची अपेक्षा नाही. जर काही नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तरच दरांमध्ये झाला तर फरक होऊ शकतो.
- सतीश जैन, कांदा व्यापारी
कोट-
यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच कांदा दर आटोक्यात राहिले आहेत. आताही दर स्थिर आहेत. परराज्यातील व्यापाऱ्यांना स्थानिक पातळीवरच योग्य दरात कांदा उपलब्ध होत आहे. यामुळे सध्या कांदा दर स्थिर आहेत.
- दीपक गवळी, कांदा व्यापारी