उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:40 PM2019-12-06T18:40:46+5:302019-12-06T18:41:08+5:30

सध्या कांद्याचे दर चांगलेच वधारल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. परिणामी, कांद्याची विक्र मी लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. कांद्याच्या दरवाढीमुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे नाराजी व्यक्त होत असून, शेतकºयांना समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Farmers have a tendency towards onion cultivation due to high rates | उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल

उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल

googlenewsNext
ठळक मुद्देदरवाढीच्या उलटसुलट चर्चांमुळे शेतकऱ्यांत नाराजी

देवळा : सध्या कांद्याचे दर चांगलेच वधारल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. परिणामी, कांद्याची विक्र मी लागवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. कांद्याच्या दरवाढीमुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे नाराजी व्यक्त होत असून, शेतकºयांना समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मध्यंतरी अवकाळी पावसामुळे रब्बीचा हंगाम लांबणीवर पडला होता. शेतीची कामे खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतित होते. सर्वत्र विहिरींना चांगले पाणी असल्यामुळे शेतकरी रब्बी हंगामासाठी शेतीची मशागत करण्यात व्यस्त झाले आहेत. बैलांचा सांभाळ करणे परवडत नसल्यामुळे शेती मशागतीसह सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करण्यावर भर दिला जात आहे. कांदा उत्पादक शेतकºयांनी रब्बी हंगामासाठी आतापर्यंत तीनवेळा उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले, परंतु सततच्या पावसामुळे ते बियाणे खराब झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. कांदा बियाणाचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला व बियाणाचे दर गगनाला भिडले. परंतु यातून मार्ग काढत शेतकºयांनी १५ दिवसांपूर्वी पुन्हा उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले व निसर्गाने साथ दिल्यामुळे कांद्याची रोपे चांगल्या स्थितीत दिसत आहेत. सदर रोपे जानेवारी महिन्यात लावणी योग्य झाल्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची आवक सुरू होईल. सध्या मात्र शेतकºयांच्या घरातदेखील कांद्याची चणचण भासत आहे.
 

Web Title: Farmers have a tendency towards onion cultivation due to high rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.