शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 01:40 PM2020-03-03T13:40:31+5:302020-03-03T13:40:40+5:30
महात्मा फुले कर्जमाफी :ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता पाटोदा ,-गोरख घुसळे :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची ...
महात्मा फुले कर्जमाफी :ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता
पाटोदा ,-गोरख घुसळे :- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर न झाल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. येवला तालुक्यातील या योजनेसाठी सुमारे १८४८३ पात्र लाभार्थी शेतकरी असून सुमारे २०० कोटी रु पयांचे अनुदान मिळणार आहे.मात्र ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता सुरु झाल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून याद्या जाहीर न झाल्याने लाभ मिळण्यासाठी शेतकº्यांना सुमारे एक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चर्चा असल्याने शेतकरी वर्गाची धाकधूक वाढली आहे.
राज्यातील शेतकर्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना राबविली असून कर्ज माफीस पात्र लाभार्थी शेतकº्यांची पहिली यादी २४फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली असून दुसरी यादी २८ फेब्रुवारी जाहीर करण्याचे सांगण्यात आले होते .
महाविकास आघाडीने शेतकरी वर्गासाठी दोन लाख रु पयांपर्यंत कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती त्यानुसार कर्जमुक्तीचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून माहिती संकलित करून सर्व पात्र लाभार्थी शेतकº्यांच्या बँक खात्याला आधार जोडणीची प्रक्रि या सुरु होती .त्यानंतर प्रायोगिक तत्वावर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील शेतकº्यांची यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान दुसरी यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा असतांना ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने हि दुसरी यादी आचारसंहितेत अडकल्याने शेतकºयांमध्ये निराशा पसरली आहे.
-