कुपोषण निर्मूलनासाठी शेतकऱ्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:28 AM2018-06-19T01:28:01+5:302018-06-19T01:28:01+5:30

नाशिक जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली असतानाच जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी नगर जिल्ह्णातील एका शेतकºयाने मदतीचा हात पुढे केला आहे. ४० किलो शेवगा बिया या शेतकºयाने मोफत दिल्या आहेत.

 Farmer's help to eradicate malnutrition | कुपोषण निर्मूलनासाठी शेतकऱ्याची मदत

कुपोषण निर्मूलनासाठी शेतकऱ्याची मदत

Next

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक मोहीम सुरू करण्यात आली असतानाच जिल्ह्यातील कुपोषणमुक्तीसाठी नगर जिल्ह्णातील एका शेतकºयाने मदतीचा हात पुढे केला आहे. ४० किलो शेवगा बिया या शेतकºयाने मोफत दिल्या आहेत.  कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास हातभार लागावा या सामाजिक भावनेतून अहमदनगर जिल्ह्णातील शेवगाव येथील श्रीराम धूत या शेतक-याने जिल्हा परिषदेत स्वखर्चाने ४० किलो शेवग्याच्या बिया अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांच्याकडे सुपुर्द केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हा परिषदेचे सूत्रे घेतल्यापासून कुपोषण या विषयाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. यासाठी जिल्ह्णात नव्याने सर्वेक्षण करून माहिती घेण्यात आली आहे. जिल्हाभरात तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांसाठी ग्रामस्तरावर बाल ग्राम विकास केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. कुपोषण निर्मूलनासाठी आहार तसेच औषध याबरोबरच गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके यांच्यासाठी शेवगा किती महत्त्वपूर्ण आहे याबाबत डॉ. गिते यांनी माहिती देत जिल्हा शेवगामय करण्याचा निर्धार केला आहे. अंगणवाडी परिसर, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी शेवगा लागवड करण्यात येत आहे. यासाठी शेतकरी मोफत बियाणे उपलब्ध करून देत आहेत.
नाशिक जिल्ह्णात सुरू असलेल्या या उपक्र माची माहिती मिळालेल्या नगर जिल्ह्णातील शेवगाव (ता. शेवगाव) येथील श्रीराम धूत या ७५ वर्षीय शेतकºयाने आपल्याकडील ४० किलो शेवगा बियाणे जिल्हा परिषदेला मोफत उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे आदींच्या उपस्थितीत बियाणे सुपुर्द केले.

Web Title:  Farmer's help to eradicate malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.