शेतक-यांची महापालिकेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:08 PM2020-09-29T23:08:04+5:302020-09-30T01:10:39+5:30
नाशिक- मखमलाबाद शिवारात आधी नगररचना योजना आणि नंतर ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट राबविण्याच्या प्रस्तावाला या भागातील शेतक-यांचा विरोध कायम असून महासभेत टीपीच्या ...
नाशिक- मखमलाबाद शिवारात आधी नगररचना योजना आणि नंतर ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट राबविण्याच्या प्रस्तावाला या भागातील शेतक-यांचा विरोध कायम असून महासभेत टीपीच्या प्रारूपाला मंजुरी देऊ नये यासाठी मंगळवारी
(दि.२९) शेतक-यांनी आधी महापौरांच्या निवासस्थानी आणि नंतर मुख्यालयात धडक दिली.
नगरररचना योजनेस विरोध करण्यासाठी गेल्या तीन ते चार दिवसांपासून शेतकरी आणिशेतकरी आणि त्यांचे प्रतिनिधी आयुक्त, महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन विरोध नोंदवत होते. मंगळवारी (दि.२९) महासभेत
यासंदर्भातील प्रस्ताव असल्याने सकाळीच महापौर सतीश कुलकर्णी यांच्या शासकिय निवासस्थान असलेल्या रामायण या बंगल्यावर धडक दिली. त्यामुळे गोंधळ उडाला. सुरक्षा यंत्रणा कडक करतानाच सर्व प्रवेशव्दार सुरक्षा रक्षकांनी बंद केले. त्यामुळे शेतकरीच काय परंतु महापालिकेच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांना प्रवेश मिळणे कठीण झाले. शेतकरी आंदोलन करण्यासाठी आलेले बघितल्यानंतर विरोधकांना देखील स्फूरण चढले. मात्र, प्रस्ताव अभ्यासासाठी दोन ते चार दिवस राखीव ठेवा असे सांगत सर्वांनीच बेतास बात विरोध केला.
विरोध करूनही प्रस्ताव मंजूर झाल्याचे समजल्यानंतर सत्ताधारी भाजपवर आगपाखड केली. प्रवेश नाकारल्याने प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. दरम्यान, यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन महापौरांना दिले.
प्रस्तावित हरित क्षेत्र विकास योजनेसाठी महासभेने काही अटी, शर्तींवर परवानगी दिली होती. मात्र, त्याचे पालन झाले नाही असा आरोप आंदोलकांनी केला. याप्रकल्पास पन्नास टक्यांपेक्षा अधिक शेतक-यांचा विरोध असल्याची खात्री नगररचना विभागाच्या संचालकांनी करावी आणि नियमानुसार टीपी स्कीमचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. निवेदन देणाºयांमध्ये बालाजी बेंडकुळे, शाम काश्मीरे, किसन वाघमारे, अरूण थोरात, भरत जगझाप, हरी जगझाप, किशोर मोरे, शंकर खैरे आदींचा समावेश होता.
भाजपात फाटाफुट
महापालिकेत भाजपाची सत्ता असून देखील नगररचनाच्या विषयावरून याच पक्षात फाटाफूट असल्याचे दिसून आले. उपमहापौर भिकुबाई बागुल यांनी यापूर्वीपासूनच या विषयाला विरोध केला आहे. माजी नगरसेवक संजय बागुल
यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी महापालिकेत निवेदने दिली आहेत. त्यानंतर भाजपाचेच माजी नगरसेवक सुरेश पाटील देखील शेतकºयांचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे या विषयावरून भाजपातील फाटाफुट उघड झाली आहे.