संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:11+5:302021-08-23T04:17:11+5:30
गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने सोयाबीन उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. सोयाबीनचे ...
गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने सोयाबीन उत्पादकांत चिंतेचे वातावरण पसरले होते. सोयाबीनचे पीक पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाने मध्येच दडी मारल्याने सोयाबीनला पाणी भरावे लागते की काय या चिंतेने शेतकरी होते. यात काही शेतकऱ्यांनी सोयाबीनला पाणी भरले. परंतु ऐंशी टक्के शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर बुधवारपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. मधूनमधून तुरळक सरी पडत होत्या, मात्र गुरुवारी सकाळपासूनच संततधार पाऊस पडत होता. हा पाऊस दिवसभर पडत होता यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा पाऊस सोयाबीन ऊस, मका, या पिकांना पोषक ठरणार आहे. या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने यापुढेही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे.
(२२ निफाड १)
संततधार पाऊस पडत असताना करंजगाव येथे दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे घेतलेले विहंगम दृश्य.
220821\22nsk_25_22082021_13.jpg
संततधार पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत