लग्नसराईत शेतकऱ्यांची शेतकामांची धांदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:23 PM2020-08-27T23:23:03+5:302020-08-28T00:42:53+5:30
खडकी : ग्रामीण भागात भाद्रपद महिन्यातही लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतकामे व लग्न मुहूर्त साधण्यात धांदल उडाली आहे. यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकी : ग्रामीण भागात भाद्रपद महिन्यातही लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतकामे व लग्न मुहूर्त साधण्यात धांदल उडाली आहे. यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.
कोरोनामुळे लग्न साध्या पद्धतीने होत असल्याने साधारण कुटुंबाची दोन ते अडीच लाखांचे बचत होणार आहे. डीजे, बॅण्ड, मंडप या गोष्टींना फाटा देऊन लग्न सोहळा उरकला जात आहे. यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून लग्न सोहळे झालेले नाही. मुहूर्त न मिळाल्याने श्रावण-भाद्रपद महिन्यातही मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ साध्या पद्धतीने उरकण्यावर भर देण्यात आला आहे.
पावसाचे दिवस असल्याने शेतकामाचा हंगामातही शेतकºयांनी लग्नाचा मुहूर्तही व्यवस्थितपणे हाताळला आहे. पुढेही लग्नाची घाईगर्दी वाढणार असल्याने जी लग्न आधीच जमलेली आहे ती उरकून घेतली जात आहे. कोरोनामुळे गेल्या मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने लग्न सोहळे बंद आहेत. त्यामुळे बॅँड, डीजेवादकांवर उपासमार आली आहे.
अन्यथा अशी परिस्थिती कधीही न उद्भवल्याने भाद्रपद महिन्यात हिंदू लग्न पद्धती प्रथा प्रचलित नव्हती. मात्र पद्धती 2020 मध्ये अस्तित्वात आली आहे. आर्थिक व्यवस्थापनकोरोनामुळे लग्न समारंभाला पन्नास ते शंभर लोक उपस्थित राहण्याची अट आहे. यामुळे लग्न गदी साध्या पद्धतीने साजरे होत आहे. डीजे, बँड, मंडपांना फाटा देऊन साध्या पद्धतीने लग्न केली जात असल्यामुळे खर्चाची बचत होत आहे. यामुळे साधारण कुटुंबाचा लाखांचा खर्चाची बचत होत असल्याने आर्थिक व्यवस्थापन होत आहे. ही पद्धती सुरू राहावी अशी इच्छा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.