शेतमजुरांच्या झोपड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:23 AM2018-05-30T01:23:46+5:302018-05-30T01:23:46+5:30

येथील डाव्या  कालव्याजवळील अतिक्र मण  हद्दीत मोकळ्या जागेत झोपड्या बांधून राहणाऱ्या दोन मोलमजुरी करणाºया मजुरांच्या झोपड्या  रात्री ३ वाजेच्या सुमारास  लागलेल्या आगीत खाक  झाल्याने या दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

 Farmers' huts burned | शेतमजुरांच्या झोपड्या जळून खाक

शेतमजुरांच्या झोपड्या जळून खाक

Next

देवगाव : येथील डाव्या  कालव्याजवळील अतिक्र मण  हद्दीत मोकळ्या जागेत झोपड्या बांधून राहणाऱ्या दोन मोलमजुरी करणाºया मजुरांच्या झोपड्या  रात्री ३ वाजेच्या सुमारास  लागलेल्या आगीत खाक  झाल्याने या दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. कामगार तलाठी किरडे, पोलीसपाटील सुनील बोचरे, कोतवाल निवृत्ती तासकर यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.  देवगाव येथे डाव्या कालव्याजवळील अतिक्रमण  हद्दीत काही शेतमजूर झोपडी बांधून राहत होती. सोमवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला.  सुदैवाने हे दोन्ही कुटुंब झोपडीच्या बाहेर झोपलेले असल्याने जीवितहानी टळली. परिणामी यात अनिता ज्ञानेश्वर गायकवाड यांचे संसारोपयोगी साहित्य, भांडी, कपडे, धान्य असा संपूर्ण ऐवज जळाला असून, तलाठी किरडे यांनी सहा हजारांचा पंचनामा केला आहे. अनिता गायकवाड यांच्यासह तीन मुले राहत होती तर वत्सलाबाई सुकदेव गायकवाड यांचीदेखील झोपडी जळाल्याने त्यांचेही सहा हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. झोपडीत धान्य, तेल, मीठ, मिरची, कपडे आदी सर्व साहित्य जळाल्याने या दोन्ही कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहे. या शेतमजुरांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने त्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देवगाव गावासह परिसरातील शेतकयांनी केली आहे.

Web Title:  Farmers' huts burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग