तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 04:10 PM2018-05-29T16:10:12+5:302018-05-29T16:10:12+5:30

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Farmers injured in rain attack | तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

googlenewsNext

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी शेतक-यास उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरसाच्या टोळीने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्याने सायाळे परिसरातील शेतक-यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सिन्नरच्या पूर्व भागातील नाशिक व अहमदनगरच्या सरहद्दीवरील सायाळे गाव नेहमीच अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षात या भागात लांडगे वगळता अन्य कोणताही हिस्त्र जंगली प्राणी आल्याची घटना ऐकीवात नाही. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात ४ ते ५ तसरांची टोळी वावरतांना दिसत असल्याचे अनेक शेतक-यांनी पाहिले आहे. रविवारी सायंकाळी सायाळे शिवारातील थोरात मळ्यात रामचंद्र भीका थोरात हे कोरड्याठाक असलेल्या गवळ नदीजवळ जनावरे चारत असतांना अचानक तरसाने त्यांच्यावर हल्ला केला. तरसाने थोरात यांच्या नाकावर गंभीर जखम केली. त्याचबरोबर दोन्ही हातावर तरसाच्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या. थोरात यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. सायाळे व पाथरे सरहद्दीवर असलेल्या बाळू खळदकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तरसाने हल्ला चढविला. त्यात खळदकर यांचे वासरु गंभीर जखमी झाले. त्याचबरोब नवनाथ थोरात यांची गाय तरसाच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. विजय विठ्ठल लांंडगे यांच्या ऊसाजवळ व संजय कोरडे यांच्या डाळींब बागेवर गेल्या काही दिवसांपासून ४ ते ५ तरसांची टोळी वावरतांना दिसत आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सायाळे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी वनविभागास याबाबत माहिती दिली आहे. मात्र दोन दिवसांपासून वनविभागाचे कर्मचारी आले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसराच्या टोळीने उच्छांद मांडल्यामुळे शेतात काम करण्यासाठी जाण्यास मजूर तयार होत नाही. वाड्या-वस्त्यांवर शेतात राहणा-या शेतक-यांमध्ये तरसांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने या तरसांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

Web Title: Farmers injured in rain attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक