सायाळे परिसरात तरसाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:20 AM2018-05-30T01:20:04+5:302018-05-30T01:21:02+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरसाच्या टोळीने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्याने सायाळे परिसरातील शेतकºयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सिन्नरच्या पूर्वभागातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सायाळे गाव नेहमीच अवर्षणग्रस्त म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षात या भागात लांडगेवगळता अन्य कोणताही हिंस्र जंगली प्राणी आल्याची घटना ऐकिवात नाही. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात ४ ते ५ तसरांची टोळी वावरताना दिसत असल्याचे अनेक शेतकºयांनी पाहिले आहे. रविवारी सायंकाळी सायाळे शिवारातील थोरात मळ्यात रामचंद्र भिका थोरात हे कोरड्याठाक असलेल्या गवळ नदीजवळ जनावरे चारत असताना अचानक तरसाने त्यांच्यावर हल्ला केला. तरसानेथोरात यांच्या नाकावर गंभीर जखम केली. त्याचबरोबर दोन्ही हातावर तरसाच्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या. थोरात यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. सायाळे व पाथरे सरहद्दीवर असलेल्या बाळू खळदकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तरसाने हल्ला चढविला. त्यात खळदकर यांचे वासरू गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर नवनाथ थोरात यांची गाय तरसाच्या हल्ल्यात जखमी झाली आहे.
दोन तरस पिसाळलेले
गेल्या आठवड्याभरापासून सायाळे परिसरात तरसाची टोळी दिसत आहे. त्यातील दोन तरस पिसाळलेले असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकºयांसह पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढल्याचे शेतकºयांनी सांगितले. वनविभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तरसांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
गायीने वाचविले मालकाचे प्राण
रविवारी सायंकाळी गवळ नदीजवळ जनावरे चारत असताना तरसाने रामचंद्र थोरात यांच्यावर हल्ला केला. यावेळी थोरात यांनी वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र जवळ कोणीही नव्हते. यावेळी थोरात यांची गाय मदतीला धावली. तिने दोन्ही शिंगात तरसाला उचलून फेकले. त्यानंतर तरसाने गायीवर हल्ला केला. यात गाय जखमी झाली. गायीने मात्र आपल्या मालकाची तरसाच्या तावडीतून सुटका केली. मालकाचे प्राण वाचविणाºया या गायीची परिसरात चर्चा होत आहे.