कांदा साठविण्यासाठी शेतकऱ्यांनी शोधला नाविन्यपूर्ण चाळीचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:59+5:302021-05-17T04:12:59+5:30
येवला तालुक्यात नगदी पीक म्हणून कांदा शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या कांदा उत्पादनातून अनेक शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली ...
येवला तालुक्यात नगदी पीक म्हणून कांदा शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या कांदा उत्पादनातून अनेक शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली आहे. पुढील काळात बाजारभाव वाढतील तसेच खरीप हंगामातील शेतीला भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी वर्ग उन्हाळी कांदा हा चाळीत साठविण्यला प्राधान्य देतो .पारंपारिक पद्धतीने कांदा चाळ बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो.कांदा साठविण्याची सोय नसल्यास शेतकऱ्यांना कांदा शेतातून काढल्यानंतर लगेच बाजारात विकण्याशिवाय पर्याय नसतो .आशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याने याला पर्याय म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी जुगाड करून कमी जागेत व अत्यल्प खर्चात कांदा साठविण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करून कांदा चाळ तयार करून कांदा साठविला जात आहे.या चाळीत हवा मोकळी राहात असल्याने कांद्याची टिकवण क्षमता वाढणार आहे.
साधारणपणे पन्नास फूट लांब व सहा फूट रुंदीची लोखंडी तारेची जाळी चार हजार रुपयांना विकत मिळते त्यापासून त्यापासून चार गोल गाळे तयार करून त्यात गोलाकारपणे कांदा भरला जातो .एका गोलात साधारणपणे पंचवीस ते तीस क्विटल कांदा साठवता येतो. चार हजार रुपयात सुमारे १०० क्विटल कांदा साठवला गेला आहे. हवा खेळती राहत असल्याने हा कांदा सुमारे सात ते आठ महिने टिकू शकतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
कोट...
कांदा साठविण्यासाठी चाळ बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असून आजच्या घडीला हा खर्च करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कांदा चाळ तयार करण्यासाठी फक्त चारशे ते पाचशे रुपये खर्च येत असून श्रमही अत्यल्प आहे. कांदाही जास्त दिवस टिकणार असून या लोखंडी जाळीचा पुन्हा वापर करता येणार आहे. शेतकऱ्यांनी या सोप्या पद्धतीचा कांदा साठविण्यासाठी अवलंब करावा.
- भास्कर शेळके, कांदा उत्पादक शेतकरी ठाणगाव
===Photopath===
160521\16nsk_10_16052021_13.jpg
===Caption===
कांदा चाळ