खडकीमाळ येथील शेतकरी आवर्तनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 04:10 PM2018-12-21T16:10:16+5:302018-12-21T16:10:45+5:30

मानोरी :येवला तालुक्यातील पश्चिम भागात दीड महिन्यापासून तीव्र दुष्काळ जाणवत असूनखडकीमाळ येथील शेतकरी पालखेड आवर्तनापासून वंचितअसल्याचीतक्रारशेतकऱ्यांनीकेलीआहे............. सध्या पालखेड डावा ...

 Farmers of Khadkimal are deprived of the rotation | खडकीमाळ येथील शेतकरी आवर्तनापासून वंचित

  गुरु वारी   वितरिका नंबर ला संध्याकाळी सहावाजता०.२३ कुसेक्स ने सुरू असलेले पाणी 

Next
ठळक मुद्दे पालखेड:रब्बीहंगामातील पिके करपून जाण्याची भिती


मानोरी :येवला तालुक्यातील पश्चिम भागात दीड महिन्यापासून तीव्र दुष्काळ जाणवत असूनखडकीमाळ येथील शेतकरी पालखेड आवर्तनापासून वंचितअसल्याचीतक्रारशेतकऱ्यांनीकेलीआहे............. सध्या पालखेड डावा कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांना तसेच पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असुन मानोरी बुद्रुक ( खडकीमाळ ) येथील वितरिका नंबर २५अद्याप आवर्तनाच्या प्रतिक्षेवर आहे. तीन दिवसांपासून वितरिका नंबर२५ ला पाणी सोडले असून बुधवारी ( दि.१९) ला संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हे पाणी मानोरी ( खडकीमाळ ) येथील शिवारात पोहोचले होते. त्यानंतरकेवळ पाच तासांत चारीचे पाणी बंद झाल्याने शेतकरी हैराण झाले. या वितरिकेला पाणी सोडल्याने पाण्याचा प्रवाह केवळ ०.३० कुसेक्स वेगानेच सोडले असल्याचे शेतकº्यांनी सांगितले. गुरु वारी ( दि.२०) ला सकाळी सात वाजता ग्रामपंचायत सदस्य पोपट शेळके , सेवा संस्थेचे अध्यक्ष नंदाराम शेळके,देवराम शेळके,संतोष आहेर,राजेंद्र शेळके,दिलीप शेळके,राहुल शेळके,नितीन शेळके,भाऊसाहेब वावधाने, शिवा शेळके,गोरख शेळके,आनंदा शेळके,उत्तम शेळके,गोविंद शेळके श्रावण शेळके,शेखर जगताप आदी खडकीमाळ येथील शेतकºयांनी पालखेड डावा कालव्याच्या अधिकाºयांना वितरिका नंबर २५ चा घडलेला प्रकार लक्षात आणून दिला. या वेळी खडकीमाळ वितरिका नंबर २५ वगळता पाणी हेड पासून तर देशमाने पर्यंत पाणी सुरळीत चालू होते. यावेळी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान पालखेड अधिकाº्यांना शेतकºयांनी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता आमचे अधिकारी आ िणपोलीस यंत्रणा घेऊन आम्ही चारी नंबर २५ च्या हेड वरती येऊन पाणी सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.यानंतर संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास०.२३ इतक्या कमी कुसेक्स ने पाणी सुरू होते.पुढचे पाच ते सात महिने भयानक दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. या सात दुष्काळी महिन्यांचे भवितव्य खडकीमाळ शेतकºयांचे पालखेड डावा काळव्यावर अवलंबून आहे. त्यात पाणी येण्याच्या आशा आता धूसर झाल्या आहेत.रब्बीच्या हंगामातील पिके सुद्धा पाण्याअभावी करपून जाणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. खडकीमाळ येथील संपूर्ण परिसर शेत शिवारात असल्याने विहिरीतील पाण्यातील केव्हाच तळ गाठलाआहे.पुढचे पिण्याचे पाण्याचे नियोजन कसे करावे अशी चिंता शेतकº्यांना पडली आहे.त्यानंतर पालखेड कालव्याचा कोणताही अधिकारी मानोरी ( खडकीमाळ ) च्या शेतकº्याकडे पोहचले नसल्याने शेतकº्यांनी पाण्याच्या या नियोजनामुळे दिवसभर चारीच्या हेड वरच ताटकळत ठेवले.पाणी प्रवाह सुरळीत करण्यासाठी शेतकºयांनी महेश पैठणकर ,छगन आहेर ,उपसभापती रु पचंद भागवत , भागवत सोनवणे आदींना वितरिका नंबर २५ ला पाणी सोडण्यासाठी दिवसभर संपर्कात होते.

तीन दिवसांपासून वितरिका नंबर २५ ला पाणी सोडलेले असून बुधवारी संध्याकाळ पासून खडकीमाळ येथे ०.२३ कुसेक्स ने पाणी असल्याने कोणत्याही शेतकºयांना या आवर्तनाचा फायदा होत नसून तात्काळ पाण्याचा प्रवाह वाढवून देणेगरजेचे आहे.
- संतोष आहेर

... सध्या दुष्काळ परिस्थितीमुळे सर्वच शेतकº्यांना पाणी मिळावे अशी अपेक्षा आहे.तरी खडकीमाळ येथे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहे".
- वैभव भागवत , अभियंता , पालखेड डावा कालवा.
 

Web Title:  Farmers of Khadkimal are deprived of the rotation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.