विजेच्या लपंडावामुळे खेडगावचे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:46 PM2021-07-17T22:46:25+5:302021-07-18T00:04:44+5:30
खेडगाव : विजेच्या लपंडावामुळे खेडगाव व परिसरातील शेतकरी सध्या चिंतित आहेत. आधीच पाऊस लांबल्याने द्राक्ष बागांवर डावणीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
खेडगाव : विजेच्या लपंडावामुळे खेडगाव व परिसरातील शेतकरी सध्या चिंतित आहेत. आधीच पाऊस लांबल्याने द्राक्ष बागांवर डावणीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
डावणी इतक्या प्रमाणात आहे की गोडयाबाराच्या सिझनला एवढ्या फवारण्या कराव्या लागत नाही, इतक्या फवारण्या कराव्या लागत आहेत. हे करीत असताना वीज सारखी जात असल्याने फवारणी करण्यासाठी तसेच बागेला ड्रीप देण्यासाठी प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत.
त्यातच मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड झालेली आहे. तिकडेही फवारण्या कराव्या लागतात; तसेच सध्या पाऊस लांबल्याने सगळ्याच पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे विजेच्या खोळंब्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनिल शेटे व इतर अनेक शेतकऱ्यांनी संबंधित अधिकारी व वीज वितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधत अडचणी सांगितल्या.