शेतकरी-मजुरांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:36 AM2018-11-17T00:36:39+5:302018-11-17T00:37:52+5:30

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतमजुरांची मजुरी कमी करण्याचा निर्णय गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला असून, मजुरांनी थेट कामावर बहिष्काराचे अस्त्र उपसल्यामुळे होत असलेल्या शेतमालाच्या नुकसानीमुळे मजूर व शेतकरी यांच्यातील वादात अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे.

Farmers-laborers | शेतकरी-मजुरांमध्ये जुंपली

शेतकरी-मजुरांमध्ये जुंपली

Next
ठळक मुद्देपोलिसांची मध्यस्थी : सामोपचाराने काम करण्याचा निर्णय

समसाद पठाण । गंगापूर : शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतमजुरांची मजुरी कमी करण्याचा निर्णय गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला असून, मजुरांनी थेट कामावर बहिष्काराचे अस्त्र उपसल्यामुळे होत असलेल्या शेतमालाच्या नुकसानीमुळे मजूर व शेतकरी यांच्यातील वादात अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे. ज्या शेतकºयाला मजुरी परवडेल तो मजुरांना घेऊन जाईल, मात्र मजुरांची गाडी न अडविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गुरुवारीच या संदर्भात गिरणारे येथे शेतकºयांची बैठक झाली होती व त्यात महिला मजुरांना दोनशे रुपये, तर पुरुष मजुराला अडीचशे रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते. हा निर्णय पंचक्रोशीतील शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात आला. शुक्रवारी त्याचे थेट परिणाम दिसेल. गिरणारे पाटी येथे मजूर नेहमीप्रमाणे जमा झाले असता शेतकºयांनी त्यांना अल्प मजुरीत नेण्याचा आग्रह धरल्यावर वाद निर्माण झाला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेतली व शेतकरी, मजुरांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकºयांनी त्यांची व्यथा मांडली. भाव घसरले असून, टमाट्याला वीस ते चाळीस रुपये क्रेट भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत टमाटे काढण्यासाठी मजुरांना ४०० रुपये कसे द्यायचे, असा सवाल केला.
मजुरांनीही वाढत्या महागाईचे कारण देत द्राक्षबागेच्या कामासाठी जादा पैसे मिळत असून, जेथे जादा मजुरी मिळेल तेथे काम करण्याची तयारी असल्याचे सांगितले. अखेर या दोघांमध्ये समेट घडवून ज्या शेतकºयाला मजुरी परवडेल तो मजुरांना घेऊन जाईल ज्यांना परवडत नाही, त्याने मजुरांना जबरदस्ती करू नये त्याचबरोबर मजुरांची गाडी कोणीही अडवणार नाही. तसे केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.

Web Title: Farmers-laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.