‘समृद्धी’च्या आडून शेतकऱ्यांची गळचेपी
By admin | Published: June 2, 2017 01:17 AM2017-06-02T01:17:02+5:302017-06-02T01:17:13+5:30
नाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेती आणि श्रम याशिवाय काहीही नसलेल्या शेतकऱ्यांच्या ‘समृद्धी’च्या नावाने जमिनी काढून घेणे हा घोर अन्यायच आहे. पर्यायी रस्ते असताना समृद्धीसाठी आग्रह करण्यात समृद्धी कुणाची, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.
नाशिकला हुतात्मा स्मारकात गुरुवारी (दि.१) समृद्धी कुणाची? शेतकऱ्यांची की सरकारची? या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. कानगो यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राजू देसले, माजी सभापती पांडुरंग वारुंगसे, दत्तात्रय डुकरे-पाटील, अरुण गायकर यांच्यासह समृद्धीबाधित शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कानगो म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. जागतिकीकरणानंतर सगळ्या प्रश्नांवर जागतिक प्रभाव पडतो आहे. शेतीमालाची भाव हातात राहिलेली नाही. त्यात दृष्काळाने
व सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. समृद्धी हाही अशाच धोरणातून जन्माला आलेला एक मोठा प्रश्न आहे. कुठलीही चर्चा नसताना, लोकशाहीने ज्या आमदार, खासदारांना अधिकार दिले आहे, अशा लोकप्रतिनिधींचे अधिकार काढून घेत, कंपनीकरणातून हा प्रकल्प लादला जातो आहे. सध्या स्थितीत दोन रस्ते, विमान, रेल्वेसेवा असताना समृद्धी रस्ता मागितला कुणी? तरीही, तो लादला जातोय असे ते म्हणाले.