उडीद, सोयाबीन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:10 AM2019-10-18T01:10:13+5:302019-10-18T01:11:51+5:30

केंद्र सरकारने यंदाही शेतकऱ्यांचे उडीद, मूग व सोयाबीन ही पिके हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यात नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र नोंदणी सुरू होऊनही शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्याने मार्केट फेडरेशनने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आॅनलाइन नोंदणीनंतरच प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात केली जाणार आहे.

Farmers' lesson towards Udid, soybean registration | उडीद, सोयाबीन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

उडीद, सोयाबीन नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ

Next
ठळक मुद्देफेडरेशनकडून मुदतवाढ : डिसेंबरमध्ये खरेदीची शक्यता

नाशिक : केंद्र सरकारने यंदाही शेतकऱ्यांचे उडीद, मूग व सोयाबीन ही पिके हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जिल्ह्यात नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र नोंदणी सुरू होऊनही शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणीकडे पाठ फिरविल्याने मार्केट फेडरेशनने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आॅनलाइन नोंदणीनंतरच प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात केली जाणार आहे.
दरवर्षी शेतकºयांनी उत्पादित केलेल्या मालाची बाजारात आवक वाढली की, व्यापाºयांकडून मालाचा भाव पाडून खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान होते. खुल्या बाजारात शेतकºयांची व्यापाºयांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकºयांनी उत्पादित केलेला माल खरेदी केला जातो. त्यासाठी सदर मालाला आधारभूत किंमत निश्चित केली जाते. गेल्या वर्षीही जिल्ह्णात अशाच प्रकारे उडीद, मूग, सोयाबी, मका, तूर या पिकांना हमीभाव देऊन शासनाने खरेदी केली होती. यंदाही आॅनलाइन पद्धतीने शेतकºयांना त्यांचा उत्पादित माल खरेदी करण्याच्या सूचना मार्केट फेडरेशनला देण्यात आल्या आहेत. यात प्रारंभी शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक असून, त्यासाठी शेतकºयांचे आधार क्रमांक, बॅँक खाते क्रमांक, सातबारा उताºयावर पिकाची नोंद, एकूण हेक्टर आदी बाबींची नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी मार्केट फेडरेशनने जाहिरात देऊन बाजार समित्या, खरेदी-विक्री संघांना आवाहन केले होते. मात्र येवला खरेदी-विक्री संघानेच त्यासाठी तयारी दर्शविली आहे.
यंदा शासनाने गत वर्षाच्या तुलनेत हमीभावात वाढ केली असून, उडिदासाठी ५७०० रुपये क्विंटलला दर देण्यात आला असून, गेल्या वर्षी ५६०० इतका भाव होता. तर मूगसाठी ७०५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. गतवर्षी ६९७५ इतका दर होता. सोयाबीनसाठी ३७१० रुपये दर देण्यात आला आहे. गेल्या वर्षापेक्षा तीनशे रुपयांनी हा दर अधिक आहे. शासनाने १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करण्याची मुदत दिली होती. मात्र या काळात जेमतेम दहा ते बारा शेतकºयांनीच नोंदणी केली आहे. नोंदणीला शेतकºयांचा प्रतिसाद न मिळाल्याचे पाहून पणन महामंडळाने पुन्हा एक आणखी मुदतवाढ दिली आहे. त्यात आता उडीद, सोयाबीनसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, मूगाची नोंदणी ३१ आॅक्टोबरपर्यंत करता येणार आहे. नोंदणीनंतरच साधारणत: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फेडरेशनकडून खरेदी सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
मका खरेदीसाठी परवानगीची प्रतीक्षा
लवकरच शेतकºयांचा मका बाजारात येणार असून, यंदाही फेडरेशनकडून मका खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रे सुरू करण्यासाठी मार्केट फेडरेशनने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्ह्णातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर, देवळा, नामपूर, लासलगाव व चांदवड या नऊ ठिकाणी आॅनलाइन नाव नोंदणी केंद्रे सुरू करावयाची आहेत. प्रशासनाकडून अनुमती मिळाल्यावर हे केंद्रे कार्यान्वित होतील. मक्याला यंदा शासनाने १७६५ रुपये क्विंटल भाव निश्चित केला आहे. बाजारात मका येण्यास सुरुवात झाली असून, त्याचा दर मात्र दोन हजार ते २२०० रुपये इतका आहे.

Web Title: Farmers' lesson towards Udid, soybean registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.