शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:14 PM2020-06-10T22:14:48+5:302020-06-11T00:56:27+5:30

नांदूरशिंगोटे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीप पूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. सोमवारपासून मृग नक्षत्र प्रारंभ झाल्याने शेतकºयांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.

Farmers look at the sky | शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर

शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर

googlenewsNext

नांदूरशिंगोटे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीप पूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. सोमवारपासून मृग नक्षत्र प्रारंभ झाल्याने शेतकºयांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन करून संचारबंदी केल्याने शेतकºयांनी आपले लक्ष शेतीकडे केंद्र्रित केले होते. खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे आटोपून घेतली आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी होऊन बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकºयांकडे असणारे उन्हाळी पिके निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान सोसावे लागले आहे.
सुमारे दोन वर्षापासून शेतकºयांच्या पाठीमागे आर्थिक संकट उभे राहिले आहे. प्रथम दुष्काळ व गतवर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस यामुळे खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, तर यावर्षी सुरुवातीलाच कोरोनाचे संकट सुरु झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेवटच्या टप्प्यात निर्बंध हटविल्याने ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली आहे.
रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी व मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मशागतीचे काम उरकून कधी एकदा पेरणीची मूठ धरत, असे शेतकºयांना झाले आहे. बियाणे व खत खरेदीसाठी शेतकºयांनी कृषी सेवा केंद्रामध्ये गर्दी केल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तसेच काही शेतकºयांनी खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाणांवर भर दिला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग शेतकरी गट तयार करून या गटामार्फत बी-बियाणे, खत खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामासाठी पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मोफत बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी होत आहे.
-------------------------
काटवन परिसरात खरिपाची लगबग
कुकाणे : अजंग-वडेल व कुकाणे परिसरात शेतकºयांना आता खरिपाचे वेध लागले असून, शेती मशागतीचे कामे सुरू झाली आहेत. बैलजोडीच्या मदतीने शेती करण्याच्या पारंपरिक पद्धतीला शेतकºयांनी रामराम ठोकला असून, आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागतीला पसंती दिली जात आहे. परिसरात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. कोरोना महामारीमुळे गेले काही दिवस सर्व व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला होता.
आता शासनाने नियम शिथिल
केल्यामुळे हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे. शेतकरीही नांगरणी, कोळपणी करण्यात व्यस्त आहे.
खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे. गत वर्ष पावसामुळे नुकसानीचे ठरले तर आता सुरवातीला कोरोना महामारीमुळे पूर्ण बंद असल्याने शेतकºयांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. कोरोना महामारीने संपूर्ण अर्थव्यवस्था उद्वस्थ केले असून, शेतकरी हा पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे.

Web Title: Farmers look at the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक