वीजवाहिन्यांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:11 PM2020-06-11T22:11:45+5:302020-06-12T00:28:40+5:30
चांदोरी : महावितरणच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षभरापासून वीजवाहिन्या पिकाला टेकत आहेत, तर खांब तिरपे झाले आहेत. वारंवार तक्र ार करूनही महावितरण विभाग शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
चांदोरी : महावितरणच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षभरापासून वीजवाहिन्या पिकाला टेकत आहेत, तर खांब तिरपे झाले आहेत. वारंवार तक्र ार करूनही महावितरण विभाग शेतकºयांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी गावात पर्णकुटी क्र. २च्या आसपासच्या शेतात वीजवाहिन्या लोंबकळत असून, म्हसोबा रोड येथील विजेचा खांब तिरपा झाला आहे. याबाबत महावितरण कंपनीकडे शेतकºयांनी तक्रार केली आहे. वीजवाहिन्या वर करणे व खांब सरळ करण्याची तसदी महावितरण कंपनीने अद्यापही घेतलेली नाही.
म्हसोबारोड येथील खांब पूर्ण तिरपा झाला आहे. त्यामुळे वाहिन्यांवर ताण आल्याने त्या तुटण्याची
शक्यता आहे. पावसाळ्यात वादळी वाºयाने हा खांब कधीही कोसळू शकतो. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
शेतामधील खाली आलेल्या वाहिन्यांमुळे शेतकºयांना काम करताना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. शॉर्टसर्किट झाल्यास शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी यात विशेष लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
---------------------------
शेतात खाली आलेल्या वीजवाहिन्यांमुळे जीव मुठीत धरून शेतीची कामे करावी लागत आहे. या संदर्भात महावितरण विभागाकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
- तुषार खरात, शेतकरी, चांदोरी
--------------------------------
वादळी पावसामुळे पडलेल्या खांबांच्या कामाला प्राधान्य देऊन त्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम पूर्ण करून पुढील काही दिवसात खाली आलेल्या वाहिन्या व वाकलेले खांब यांचे काम पूर्ण केले जाईल.
- विशाल मोरे, सहाय्यक अभियंता, चांदोरी सबस्टेशन