मानोरी परिसरातील शेतकरी ढगाळ हवामानामुळे हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:39 PM2020-01-25T22:39:42+5:302020-01-26T00:15:56+5:30

सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदा लागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे.

Farmers in the Manori area are breezy due to cloudy weather | मानोरी परिसरातील शेतकरी ढगाळ हवामानामुळे हवालदिल

मानोरी परिसरातील शेतकरी ढगाळ हवामानामुळे हवालदिल

Next

मानोरी : येवला तालुक्यात सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदा
लागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, शिरसगाव, पिंपळगाव लेप, मुखेड, देशमाने, जळगाव नेऊर, नेऊरगाव आदी भागात दीड महिन्यापासून उन्हाळ कांदा लागवड मोठ्या जोमात सुरू आहे. यंदा पाणी पुरेसे असल्याने तसेच बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर टिकून असल्याने उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. मात्र वातावरण सातत्याने बदलत असल्याने
कधी ढगाळ तर कधी दवबिंदू पडत असल्याने कांद्यासह रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. अवकाळी पावसातून मका, सोयाबीन, कांदे आदी पिकांच्या नुकसानीतून सावरत असतानाच वातावरणात अचानक बदल झाल्याने नवीन कांदा लागवडीवर त्याचा परिणाम होत आहे.
द्राक्ष बागायतदारांसाठी ढगाळ वातावरण डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. द्राक्षाचे उत्पादन हे वर्षातून एकदाच मिळत असते. त्यामुळे द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेतकरीवर्ग सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Farmers in the Manori area are breezy due to cloudy weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.