किसान सभेच्या वतीने शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:55 PM2018-04-01T23:55:30+5:302018-04-01T23:55:30+5:30
कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई विधानभवन असा पायी मोर्चा काढून शासनाला आंदोलनाची दाखल घेण्यास भाग पाडले.
कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई विधानभवन असा पायी मोर्चा काढून शासनाला आंदोलनाची दाखल घेण्यास भाग पाडले याबद्दल नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने सोमवारी (दि.२) सकाळी ११ वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती किसान सभेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार यांनी दिली. गावित यांच्या नेतृत्वाखाली दि. ६ ते १२ मार्चदरम्यान काढण्यात आलेल्या नाशिक ते मुंबई पायी मोर्चात कळवण-सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी , शेतमजूर, वनजमीनधारक, आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला होता. आदिवासींनी मागण्यांसाठी अनेकवेळा निवेदने दिली. आंदोलने, रास्ता रोको करूनदेखील शासन लक्ष देत नव्हते. दरवेळी आश्वासन वेळ मारून नेण्याचे काम शासन करत होते. सर्वसामान्य नागरिक व शेतकºयांच्या विविध मागण्या मान्य होत नसल्याने आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मार्च महिन्यात मुंबई येथे पायी जाऊन विधानभवनाभोवती घेराव आंदोलन करण्यात आले.
आदिवासी शेतकºयांनी उन्हाची पर्वा न करता मजल दरमजल करत मुंबई गाठून आंदोलन केले. शेवटी शासनाने झुकतेमाप घेऊन मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून विविध मागण्या मान्य केल्या.