स्वामी समर्थ केंद्रामार्फत सिन्नर येथे शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:36 AM2021-02-05T05:36:18+5:302021-02-05T05:36:18+5:30
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी नितीन मोरे, ...
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी नितीन मोरे, संतोष जाधव, सिन्नरचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, प्रकाश उगले, सेवामार्गाचे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब ठोक, बालसंस्कारच्या जिल्हा प्रतिनिधी रोहिणी भुसारे, तालुका प्रतिनिधी आर.पी. म्हस्के, कविता कोकाटे, सुनील लोखंडे, सोनल जाधव, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, कृषी अधिकारी कैलास भदाणे, रविकांत पवार यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली, तसेच जैविक खतांचा आणि औषधांचा वापर यांचे महत्त्व विशद केले.
शेतकरी आणि भाविकांना मार्गदर्शन करताना नितीन मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची पूर्वपीठिका विशद करून पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी आणि साधू-संतांनी निरोगी तसेच आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी घालून दिलेल्या आदर्श जीवनशैलीचा उल्लेख केला. आताच्या आधुनिक युगात शेतीला दुय्यम स्थान दिले जात असल्याचे सांगून आजच्या शिक्षण पद्धतीत शेती विषयाचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जात नसल्याने तरुणाईची ओढ शेतीकडे नाही. आजचा युवक फक्त नोकरीकडे आकर्षित होत आहे. कारण त्याला शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळेल याची शाश्वती उरलेली नसल्याचे मोरे यांनी सांगितले.
कृषी मेळाव्या निमित्ताने अठरा विभागांची माहिती देणारे स्टॉल्स मांडण्यात आले होते. भारतीय सण आणि व्रत-वैकल्याची माहिती देणारे व मांडणी केलेल्या मराठी अस्मिता विभाग, तसेच कृषी उपयोगी साहित्य निर्माण करणाऱ्या उद्योग समूहाचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. प्रास्ताविक संतोष जाधव यांनी, तर सूत्रसंचालन गणेश सरोदे यांनी केले.
===Photopath===
020221\02nsk_29_02022021_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या मार्फत आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना नितीन मोरे.