मातोरी येथील बॅँकेची वेळ बदलल्याने शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:26 PM2019-12-13T23:26:24+5:302019-12-14T00:46:22+5:30

मातोरी गावातील महाराष्ट्र बँकेने कामकाजाच्या पूर्वीच्या वेळेत अचानक बदल केल्यामुळे खातेदार, सभासदांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, सद्याची वेळ बदलून ती पूर्वीसारखीच ठेवावी यासाठी गावातील महिला बचत गटाने एकत्र येत बॅँकेत धाव घेतली व अधिकाऱ्यांना निवेदन साद केले.

Farmer's Metacutis, due to changing bank time at Matori | मातोरी येथील बॅँकेची वेळ बदलल्याने शेतकरी मेटाकुटीस

मातोरी येथील बॅँकेची वेळ बदलल्याने शेतकरी मेटाकुटीस

Next
ठळक मुद्देमहाराष्टÑ बॅँकेला महिला बचत गटाचे पत्र

मातोरी : मातोरी गावातील महाराष्ट्र बँकेने कामकाजाच्या पूर्वीच्या वेळेत अचानक बदल केल्यामुळे खातेदार, सभासदांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून, सद्याची वेळ बदलून ती पूर्वीसारखीच ठेवावी यासाठी गावातील महिला बचत गटाने एकत्र येत बॅँकेत धाव घेतली व अधिकाऱ्यांना निवेदन साद केले.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या दिवसाची सुरुवात सकाळी ७ वाजेपासूनच होत असते. घरातील कामे आटोपून साधारणपणे आठ ते नऊ वाजेपर्यंत महिला, पुरुष कामासाठी शेतात रवाना होत असतात. त्यामुळे सकाळी ११ वाजता महाराष्टÑ बॅँकेचे कामकाज सुरू होत असताना त्याचा फारसा उपयोग शेतकऱ्यांना होत नसल्यामुळे बॅँकेचे कामकाज करण्यासाठी शेतकºयांना दिवस बुडवावा लागत होता. याचा विचार करून गावात २०१४ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या बँक आॅफ महाराष्ट्राच्या दैनंदिन कामकाजाची वेळ तत्कालीन व्यवस्थापक कुलकर्णी यांनी शेतकºयांची अडचण लक्षात घेऊन बॅँकेचे कामकाज सकाळी १० वाजेपासून सुरू केले होते. त्यामुळे बँकेने अल्प काळातच मोठ्या प्रमाणावर नवीन खातेदार व ठेवीदार मिळविले होते.
ग्राहकांच्या सोयीनुसार असलेली वेळ सर्वांच्याच सोयीची असताना आता अचानक बँकेने वेळेत बदल केला आहे. बॅँकेच्या कामकाजाची वेळ बदलल्यामुळे त्याचा मोठा फटका महिला वर्गाला बसत आहे. शेतकºयांना शेतीसाठी औषधे, अवजारे खरेदी करण्यासाठी सकाळीच पैशांची गरज भासते. अशा वेळी बॅँक बंद असल्यास त्यांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत कामाचे नियोजन चुकत असते.
सकाळी ११ वाजता बॅँकेचे कामकाज सुरू झाल्यास ग्राहकांच्या रांगा लागून पैसे काढणे वा भरण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी वाया जात असल्यामुळे बॅँकेने वेळेत बदल करावा, अशी मागणी करीत गावातील बचत गटातील महिलांनी एकत्र येत सह्यांची मोहीम राबविली व बॅँकेच्या अधिकाºयांना निवेदन सादर केले आहे.

Web Title: Farmer's Metacutis, due to changing bank time at Matori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.