शेतमजुरीत वाढीच्या विरोधात शेतकरी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:47 AM2018-11-17T00:47:35+5:302018-11-17T00:47:50+5:30

शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकºयांना शेतकामासाठी लागणाºया मजुरांनी रोजंदारीत अवास्तव वाढ केल्याने परिसरातील शेतकºयांनी एकत्र होत महिलांना दोनशे, तर पुरुषांना अडीचशेच रुपये रोजंदारी देण्यावर एकमत करण्यात आले तसेच त्यापेक्षा कमी अधिक मजुरी दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

Farmers mobilize against agricultural growth | शेतमजुरीत वाढीच्या विरोधात शेतकरी एकवटले

शेतमजुरीत वाढीच्या विरोधात शेतकरी एकवटले

Next
ठळक मुद्देबैठक : महिलांना दोनशे, तर पुरुषांना अडीचशे रुपये मजुरीे

जितेंद्र साठे । मातोरी : शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असताना शेतकºयांना शेतकामासाठी लागणाºया मजुरांनी रोजंदारीत अवास्तव वाढ केल्याने परिसरातील शेतकºयांनी एकत्र होत महिलांना दोनशे, तर पुरुषांना अडीचशेच रुपये रोजंदारी देण्यावर एकमत करण्यात आले तसेच त्यापेक्षा कमी अधिक मजुरी दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कमी रोजंदारीवर शेतमजूर मिळत नसल्याने व दुसरीकडे शेतमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत चालल्यामुळे विवंचनेत सापडलेल्या शेतकºयांची बैठक गिरणारे येथील घाडगे लान्स येथे घेण्यात आली.
त्यात वाडगाव, गिरणारे, मातोरी, मुंगसरे, आडगाव, मखमलाबाद, चांदशी, मनोली, दरी, साडगाव, येथील लहान- मोठे शेतकरी गिरणारे येथे जमा होणाºया मजुरांच्या पाटीवरून रोज मजूर ठरवून शेतकामासाठी शेतात घेऊन जातात, टमाटा अथवा इतर पिकास चांगल्या प्रमाणात बाजार असल्यास त्यांना शेतकरी वर्ग मजुरी वाढूनही देतात ,परंतु यंदा मात्र टमाट्याच्या पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने मजुरांना मजुरी कशी वाढून द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच इतर शेतीच्या कामासाठी येणाºया देवरगाव, कोचरगाव, हरसूल, ओझरखेड, विलवंडी, धोंडेगाव येथील महिला व पुरुष मजुरांनी ४००ते ५०० रुपये मजुरी दिली तरच कामावर येऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकºयांना वाहतूकदार याचे भाडे, टमाट्यावरील कीटकनाशके फवारणी, हमाली, मजुरांची मजुरीसाठी पैसे आणायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. यावेळी सीताराम पिंगळे, समीर धोंडगे, दीपक धोंडगे, संजय हेगडे, रमेश पिंगळे, सतीश कातड, पप्पू बर्वे, रवि साठे, तानाजी पिंगळे आदी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
टमाटा खुडणे केले बंद
टमाट्याला पन्नास रुपये क्रेट भाव व त्यात वाढीव मजुरी त्यामुळे परिसरातील शेतकºयांनी टमाटा खुडणेच बंद केले आहे. या सर्व पश्नांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी शेतकºयांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात मजुरांचाही विचार करून महिलांना २००, तर पुरुषांना २५० रुपये इतकी मजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच मजुरांना कामासाठी सकाळी शेतकºयांनी घेऊन जाणे व सायंकाळी पाच वाजता सुट्टी करून त्यांना पुन्हा पाटीवर आणून सोडण्याचे ठरले. सदरचा नियम एकाही शेतकºयाने मोडू नये अन्यथा योग्य ती कारवाही करण्याचे ठरविण्यात आले.

Web Title: Farmers mobilize against agricultural growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.