खासदारांच्या कार्यालयांसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:05 AM2018-05-28T01:05:00+5:302018-05-28T01:05:00+5:30
शेतकयांच्या प्रश्नावर विशेष संसदीय अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने दुसºया टप्प्यात रविवारी (दि.२७) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून त्यांच्याकडे विशेष संसदीय अधिवेशनाच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली.
नाशिक : शेतकयांच्या प्रश्नावर विशेष संसदीय अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने दुसºया टप्प्यात रविवारी (दि.२७) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह खासदार हेमंत गोडसे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून त्यांच्याकडे विशेष संसदीय अधिवेशनाच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली. नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या माध्यमातून विविध शेतकरी व सामाजिक संघटनांनी रविवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले. परंतु गिरीश महाजन कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर दुपारी आंदोलन समितीने खासदार हरिचंद्र चव्हाण यांच्या नाशिक शहरातील निवासस्थानासमोर सत्याग्रह आंदोलन करीत त्यांना निवेदन दिले. यावेळी चव्हाण यांनी शेतकºयांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. परंतु, गोडसे कार्यालयात नसल्याने आंदोलकांना सुमारे तासभर गोडसे यांची प्रतीक्षा करावी लागली. गोडसे कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती व शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा या मागणीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे घालण्याची मागणी केली. त्यावर गोडसे यांनी शेतकºयांच्या मागण्या रास्त असून
संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी कें द्र स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी सत्याग्रहाचा समारोप केला. या सत्याग्रह आंदोलनात महाराष्ट्र जनस्वराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवासंघ, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, छत्रपती सेना,भारतीय साम्राज्य संघटना, बळीराजा प्रतिष्ठान, मराठा क्र ांती मोर्चाच्या प्रतिनिधींनीही सहभाग घेत शेतकºयांसाठी विशेष अधिवेशनाची मागणी केली.
१ जूनचा मोर्चा रद्द; हुतात्मांना करणार अभिवादन
नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने १ जून रोजी नियोजित केलेल्या मोर्चाला रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून राष्ट्रीय किसान महासंघाचा देशव्यापी संप होणार असल्याने मोर्चाच्या निमित्ताने शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीतर्फे देण्यात आली. आंदोलन समितीने मोर्चा रद्द केला असला तरी समितीचे प्रतिनिधी हुतात्मा स्मारक ात एकत्र येऊन शेतकरी आंदोलनातील हुतात्मा शेतकºयांना अभिवादन करणार असल्याचेही नाशिक जिल्हा शेतकरी समितीतर्फे सांगण्यात आले आहे.
शेतकरी आंदोलनात झिरवाळ सहभागी
नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने २५ मे रोजी जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन केले होते. त्यावेळी दिंडोरीतील शेतकºयांना आमदार नरहरी झिरवाळ यांनी आपणही शेतकºयांसोबत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आमदार नरहरी झिरवाळ यांनीही नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या सत्याग्रह आंदोलनात सक्रिय सहभाग टाळ मृदुंगाच्या गजरात भजनही केले.
टाळ-मृदुंगासोबत इन्कलाब जिंदाबाद
नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या प्रतिनिधींनी टाळ मृदुंगाच्या तालावर भगत सिंग तू जिंदा हैं, तू जिंदा हंै, हर एक लहू के कतरे में, इन्कलाब के नारे में, तांडा चाललासारखी विविध स्फूर्ती गीतांचे गायन करून शेतकºयांनी पालकमंत्री आणि खासदारांच्या कार्यालयांसमोर सत्याग्रह आंदोलन केले. आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून गायकांना साथ देत इन्कलाब जिंदाबादची घोषणा देत शेतकरी एकजुटीचा जयजयकार केला.