कांदा अनुदानापासून नायगाव खोऱ्यातील शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 06:55 PM2019-05-14T18:55:36+5:302019-05-14T18:56:09+5:30

नायगाव : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीबरोबरच शेतकऱ्यांचे कांदा अनुदानही लांबल्यामुळे नायगाव खो-यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने जाहीर केलेले अनुदान लवकर देण्याची मागणी केली जात आहे.

 The farmers from Naigaon valley are deprived of onion grant | कांदा अनुदानापासून नायगाव खोऱ्यातील शेतकरी वंचित

कांदा अनुदानापासून नायगाव खोऱ्यातील शेतकरी वंचित

Next

वर्षभरापासून अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने दुष्काळी मदतीची घोषणा करून बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.मात्र जाहीर केलेली मदत अजुनही शेतक-यांना मिळाली नाही. तसेच प्रतिकुल परिस्थितीत पिकविलेल्या शेती मालास बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना दुष्काळी मदतीपाठोपाठ कांदा पिकास प्रती क्विंटल दोनशे रूपये अनुदान जाहीर केले. मात्र सहा महिने होऊनही शेतकरी अजुनही या अनुदानाच्या प्रतिक्षेतच आहे. यंदा भीषण दुष्काळी परिस्थती निर्माण झाल्याने शेतकरी पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चा-याच्या टंचाईमुळे हैराण झाले आहेत. वर्षभर आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दुष्काळी मदत व कांदा अनुदानाची रक्कम अजूनही मिळाली नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या शेतक-यांना शासनाने जाहीर केलेली मदत लवकर बँक खात्यावर जमा करण्याची मागणी देशवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम डोमाडे यांच्यासह नायगाव खोºयातील शेतकºयांनी केली आहे.

Web Title:  The farmers from Naigaon valley are deprived of onion grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.