शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 06:33 PM2018-02-25T18:33:52+5:302018-02-25T18:33:52+5:30
शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
नाशिक : शेतकऱ्यांनी कृषी मोहत्सव, कृषी मेळावे व कृषीप्रदर्शनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
अनंत कान्हेरे मैदानावर गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाचा रविवारी (दि.25) राज्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी तुकाराम जगताप, भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे आदी उपस्थित होते. गिरीश महाजन म्हणाले,शेतकऱ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा शेतात उपयोग करावा. जगभरात लागणारे नवे शोध अशा ठिकाणी पहायला मिळतात. म्हणून शासनाने प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकाधीक शेतकर्यांनी फायदा करून घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी विपणन आणि व्यवस्थापन कौशल्य वापरल्यास त्यांना अधिक लाभ होईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेती क्षेत्रत उल्लेखणीय कामिगरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीद्वारे तयार करण्यात आलेल्या जलदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन वेगवेगळ्य़ा उपकरणांची व कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. दरम्यान,जिल्हा कृषी प्रदर्शनाला दीड लाखाहून अधिक नागरिक आणि शेतक:यांनी भेट दिली असून सुमारे दीड कोटी रु पयांच्या उत्पादनांची विक्र ी पाच दिवसात झाली. त्याचप्रमाणो 24 शेतकऱ्यांचे वेगवेगळ्य़ा खरेदीदारांसोबत करारही झाल्याची माहिकी आत्माचे प्रकल्प संचालक .अशोक कांबळे यांनी दिली आहे.
शेंद्रीय शेतीद्वारे उत्पादनात वाढ शक्य
शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिल्यास शहरातील ग्राहकांना आकर्षित करता येईल आणि शेतमालाला अधिक भाव मिळेल. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असून कौशल्याचा चांगला वापर करीत आहे. शेतकऱ्याला पाणी आणि वीज देऊन शाश्वत शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.
डाळिंब, द्राक्ष पिकांविषयी मार्गदर्शन
पाच दिवस चाललेल्या कृषि महोत्सवात विविध चर्चासत्रे व मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रत ह्यडाळींब व द्राक्षेह्ण या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब गोरे आणि सांगली जिल्ह्यातील प्रा.वसंत माळी यांनी शेतक:यांना डाळिंब व द्राक्ष पिकांविषयी माहिती दिली.