शेतकऱ्यांना आता डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे उतारे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:38 PM2019-09-28T17:38:59+5:302019-09-28T17:39:41+5:30

घोटी : ग्रामीण भागासह शहरी भागात आपल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शुक्रवारपासून राज्यातील जनतेला १ कोटी ६७ लाख डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे महाभूमी पोर्टलवर संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.

Farmers now have seven excerpts from digital signatures! | शेतकऱ्यांना आता डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे उतारे !

शेतकऱ्यांना आता डिजिटल स्वाक्षरीचे सातबारे उतारे !

Next

घोटी : ग्रामीण भागासह शहरी भागात आपल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यांसाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाºया शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे शुक्रवारपासून राज्यातील जनतेला १ कोटी ६७ लाख डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे महाभूमी पोर्टलवर संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. यासाठी अवघे पंधरा रुपये मोजावे लागणार असून, सातबारा उताºयासाठी आॅनलाइन फी भरून त्यांचा वापर कोणत्याही कामासाठी करता येईल. यावर तलाठ्याची स्वाक्षरी घेणे आवश्यक नसून त्यावर डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला. अनेक वर्षांपासून अचूक संगणकीकृत सातबारा व खाते उतारा तयार करण्यासाठी महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार आदींसह सर्वच महसूल अधिकारी अहोरात्र काम करत आहेत. या ई-फेरफार प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आहे.  राज्यातील २ कोटी ५१ लाख सातबारांपैकी पैकी १ कोटी ६७ लाख सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे सर्व सातबारा उतारे शुक्रवारपासून राज्यातील जनतेला पेमेंट गेटवेद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Web Title: Farmers now have seven excerpts from digital signatures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक