कडवा धरणाला शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 05:29 PM2020-02-03T17:29:18+5:302020-02-03T17:30:13+5:30

सर्वतीर्थ टाकेद : अपर कडवा धरण होण्यास इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वतीर्थ टाकेद व परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, हे धरण होऊ नये यासाठी टाकेद बुद्रुक, खेड, टाकेद खुर्द, बारशिंगवे, अधरवड आदी गावांतील आदिवासी व इतर शेतकºयांनी जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभाग यांना निवेदन दिले आहे.

  Farmers oppose the bitter dam | कडवा धरणाला शेतकऱ्यांचा विरोध

 . अपर कडवा धरणास विरोध असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांना देताना पोपट लहामगे ,अशोक बोराडे , बाळू गायकवाड , विष्णू घोरपडे, शंकर चोथवे आदी.  

Next
ठळक मुद्दे  अपर कडवा धरणात ९० टक्के आदिवासी शेतकºयांच्या जमिनी जाणार असून ,आम्ही सर्व शेतकरी भूमिहीन होणार आहोत. आमचे शेती हे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग नसल्याने शंभर टक्के आदिवासी शेतकºयांचा या धरणास विरोध आहे व तो कायम राहील. -पोपट


इगतपुरीच्या पूर्व भागातील टाकेद ते खेडदरम्यान कडवा नदीवर अपर कडवा धरण मंजूर आहे. परंतु सदर धरणाला स्थानिक आदिवासी शेतकºयांचा तीव्र विरोध आहे. या भागातील शेतकरी पूर्णत: शेतीवर अवलंबून आहेत. धरणात त्यांच्या जमिनी गेल्या तर त्यांच्याकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. सदर शेतकरी धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीमुळे भूमिहीन होणार आहेत. या धरण क्षेत्रातील सर्व गावे हे पेसांतर्गत येत असल्यामुळे या भागातील आदिवासी शेतकºयांचा धरणाला विरोध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बाळू गायकवाड ,विष्णू घोरपडे, उपसरपंच पोपट लहामगे, शंकर चोथवे, शांताराम लहामगे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी तुकाराम लहामगे, कोंडाजी कालेकर, एकनाथ लहामगे ,सरपंच अशोक बोराडे ,नामदेव लहामगे, ज्ञानेश्वर चोथवे, लक्ष्मण जाधव, शंकर बर्हे आदी शेतकरी उपस्थित होते.

 

 

Web Title:   Farmers oppose the bitter dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.