पाथरे परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:08 AM2020-07-20T00:08:56+5:302020-07-20T00:13:33+5:30

पाऊस लांबल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी हातची पिके वाया जात असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतातच सोयाबीन सुकले, बाजरीने माना टाकल्या असून, मूग वाया जाण्याची भीती आहे. ऊसही गुरांना खाण्यासाठी टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Farmers in Pathre area are worried due to lack of rain | पाथरे परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त

पाथरे परिसरातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त

Next
ठळक मुद्देअस्मानी संकट : सोयाबीन, बाजरीसह मूग वाया जाण्याची भीती

पाथरे : पाऊस लांबल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी हातची पिके वाया जात असल्याने शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतातच सोयाबीन सुकले, बाजरीने माना टाकल्या असून, मूग वाया जाण्याची भीती आहे. ऊसही गुरांना खाण्यासाठी टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मका, सोयाबीन, बाजरी, मूग, भुईमूग, ऊस, डाळिंंब, भाजीपाला, फळे, भोपळा, गाजर, रताळे आदी पिके पाण्यावाचून जळू लागली आहेत. खरीप हंगाम पूर्णपणे वाया जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पाऊस झाला तर किमान आर्थिक बजेट कोलमडणार नाही या आशेने शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. जूनपाठोपाठ जुलै महिना कोरडा जात आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात नाही तर पुढचे महिने पाऊस
पडणार नाही ही शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरू शकते.
शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
पिके उभी करण्यासाठी कोरोनाकाळात मोठा खर्च केला; मात्र आता पाऊस पडला तरच हा खर्च निघू शकतो, अन्यथा शेतकºयांवर उपासमारीची वेळ येईल यात शंका नाही. कोरोनाकाळात भाजीपाला, फळे आदींसह शेतपिकांना बाजार मिळत नाही. त्यातच पाऊस नसल्याने परिस्थिती अवघड होते आहे. दररोज पावसाचे वातावरण होते, ढग जमा होतात; परंतु पाऊस न पडल्याने निराशा पदरी पडत आहे. आज पाऊस होईल, उद्या होईल, या आशेवर असणाºया शेतकºयांच्या पेरण्या आता वाया जात असल्याची भीती आहे. शेतकºयांनी केलेला खर्च व मजुरीही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

Web Title: Farmers in Pathre area are worried due to lack of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.