साकोरा येथील शेतकऱ्याची डाळिंबबाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:14 AM2018-04-26T00:14:57+5:302018-04-26T00:14:57+5:30

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील डॉक्टरवाडी रोडलगत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन एकर डाळिंबबाग खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यामुळे शेतकºयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 Farmer's pomegranate bark in Sakora | साकोरा येथील शेतकऱ्याची डाळिंबबाग खाक

साकोरा येथील शेतकऱ्याची डाळिंबबाग खाक

Next

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील डॉक्टरवाडी रोडलगत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन एकर डाळिंबबाग खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यामुळे शेतकयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.साकोरा येथील डॉक्टरवाडी रोडलगत गट क्रमांक ९६६ मध्ये रंजना अंबादास मोरे यांची शेती असून, यावरून वीजवाहिन्या गेल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी लागवड केलेली डाळिंबबाग पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळून फुलवली. मात्र मंगळवारी (दि. २४) अचानक वीजवाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीचे लोळ पडून बागेला आग लागली. शेजारी असणाºया बाळू मोरे व त्यांच्या मुलाला बागेला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून धाव घेत आग आटोक्यात आणली. ६५० झाडांपैकी १०० ते १५० झाडे वाचवण्यात त्यांना यश आले. या भागात गावठाणच्या वीजपुरवठ्याचे डीओ चढ-उतरविण्याचे काम सुरू असते. त्यामुळे येथे नेहमी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडतात. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाºयांना अनेकवेळा सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे मोरे यांनी सांगितले. मंगळवारी अशाच प्रकार होऊन आगीचे लोळ पडले. उन्हाच्या तीव्रतेमुळे आगीने रौद्र रुप धारण केले. यात डाळिंबबाग उद्ध्वस्त झाली. उपसरपंच अतुल बोरसे, तलाठी कपील मुत्तेपवार यांनी पंचनामा केला. यावेळी देवदत्त सोनवणे, शरद सोनवणे, महा-वितरणचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Farmer's pomegranate bark in Sakora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी