माळमाथ्यावर वांगी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:14 AM2021-07-27T04:14:52+5:302021-07-27T04:14:52+5:30

खडकी (अमृत कळमकर) : वांगी पिकाला एकरी पाच ते सात लाख रुपये उत्पादन मिळत असल्याने माळमाथा भागातील शेतकऱ्यांनी ...

Farmers prefer to cultivate eggplant on the hillside | माळमाथ्यावर वांगी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

माळमाथ्यावर वांगी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

Next

खडकी (अमृत कळमकर) : वांगी पिकाला एकरी पाच ते सात लाख रुपये उत्पादन मिळत असल्याने माळमाथा भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वांगे लागवडीकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या दोन वर्षापासून या भागातील शेतकरी वांग्याची लागवड करीत असून त्याला चांगला पैसा मिळू लागला आहे. त्यासाठी देशी रवैय्या वाणाची लागवड केली जात आहे. तीन बाय सहाच्या अंतरावर सुधारित पद्धतीने मे - जून महिन्यात शेतकऱ्यांनी वांगे लागवड करून एकरी पाच लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे. एका एकरमध्ये ५५ ते ६० दिवसात वांगी काढणीला येतात. प्रति एकर २५ ते ५० कॅरेट एका दिवसाला याप्रमाणे एकरी पाच लाख रुपये मिळवून देणारे उत्पादन मिळवून देणारे वांग्याचे पीक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याने शेतकऱ्यांनी माळमाथ्यावरील सुमारे २०० ते ५०० एकर क्षेत्रावर वांगे लागवड केली आहे. वांगी काढून सुरतला विक्रीसाठी नेली जातात. दळणवळणाची साधने उपलब्ध असल्याने तसेच बाजारपेठ सुधारित बाजारभावासाठी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी वांगे लागवड करावी. या पिकाचा उत्पादन खर्च कमी येतो; जंतुनाशके वापरून सशेंडा अळीचे नियंत्रण करता येते. सूक्ष्म अन्नद्रव्य वापरून ठिबक सिंचनाद्वारे खत देण्याची पद्धत आहे. सुधारित पद्धतीने मनुष्यबळही कमी लागते. काही शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी एकरी दहा लाखांचे उत्पादन घेतले आहे. यामुळे वांगे पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांना भाजीपाला व इतर पिकांच्या दृष्टीने सोयीचे झाले आहे.यापूर्वीही शेतकऱ्यांनी शेवगा, डाळिंब लागवडीचा प्रयोग केला असून आता वांगे लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

----------------------

सद्यस्थितीत क्रति............... क्रेट.................. चारशे ते पाचशे रुपये दराने वांग्याला सुरत येथे दर मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा भाव कमी आहे. तरीही उत्पादन घेणे परवडत आहे. गेल्यावर्षी एकरी दहा लाख रुपये उत्पादन मिळाले होते यंदा मात्र एकरी पाच लाख रुपये उत्पादन मिळाले.

-प्रमोद अहिरे, खडकी ता. मालेगाव (२६ प्रमोद अहिरे)

-----------------------

सद्यस्थितीत बदलत्या वातावरणामुळे जमिनीत बुरशी व शेंडअळीचे प्रमाण वांग्यामध्ये वाढलेले आहे. तेथे डेलिकेट औषधाची फवारणी केल्याने शेंडा अळी नियंत्रित करून वांग्याचे पीक यशस्वीरीत्या घेतले आहे.

-सागर चव्हाण, कृषी निविष्ठक, माळमाथा कृषी सेवा केंद्र खडकी, ता. मालेगाव. (२६ सागर चव्हाण)

Web Title: Farmers prefer to cultivate eggplant on the hillside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.