जिल्ह्यात ज्वारी, मका, सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:04 PM2020-06-29T22:04:46+5:302020-06-29T22:05:30+5:30
नाशिक : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी २६ जूनपर्यंत ६१.०९ टक्के क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे याच काळात अवघी ०.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती होती.
संजय दुनबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी २६ जूनपर्यंत ६१.०९ टक्के क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे याच काळात अवघी ०.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती होती.
जिल्ह्यात खरिपाचे साधारणत: सहा लाख ६५ हजार ५८२ हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ४ लाख ६ हजार ६०१.९६ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे, तर गतवर्षी सर्वसाधारण ५ लाख ७५ हजार ५८८ हेक्टरपैकी अवघी चार हजार २३७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी मान्सूनपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बºयाच भागात जोरदार पाऊस पडला त्यानंतर दोन-चार दिवसांतच मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली असल्याचे शेतीतज्ज्ञांनी म्हटले आहे. यावर्षी शेतकºयांनी खरिपात ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांना पसंती दिली असल्याचे दिसून येत असून, ज्वारीची सर्वसाधारणपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी कृषी विभागाने ज्वारीचे क्षेत्र ८४३ हेक्टर गृहीत धरले होते त्यापैकी जूनमध्ये केवळ २५ हेक्टरवर पेरणी झाली होती, तर चालूवर्षी ज्वारीचे क्षेत्र कमी करून ते अवघे ५५४ हेक्टर धरण्यात आले आहे.
जून महिन्यातच एक हजार ३५४ हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली असून, त्याची टक्केवारी २४४.२३ इतकी आहे.