रेल्वे प्रकल्पास जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 10:51 PM2019-09-03T22:51:44+5:302019-09-03T22:52:49+5:30
नांदूरवैद्य : प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास शेतकºयांनी विरोध केला असून, सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार ८० टक्के शेतकºयांचा जमीन देण्यासाठी विरोध असल्यास सरकारने जमिनी घेऊच नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मुसळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : प्रस्तावित रेल्वे प्रकल्पास शेतकºयांनी विरोध केला असून, सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार ८० टक्के शेतकºयांचा जमीन देण्यासाठी विरोध असल्यास सरकारने जमिनी घेऊच नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक पंढरीनाथ मुसळे यांनी केले.
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, कुºहेगाव, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख, मुकणे आदींसह विविध गावची शेकडो हेक्टर जमीन केंद्र सरकारच्या रेल्वे विभागामार्फत मालधक्का, लोकल लाइन, मनमाड-इगतपुरी नवीन रेल्वे लाइन प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली असून, या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे मंगळवारी दुपारी बाधित शेतकºयांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वच शेतकºयांनी या प्रकल्पास विरोध करण्याची भूमिका घेतली.
यावेळी घोटी बाजार समितीचे माजी सभापती राजाराम धोंगडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पाडळी देशमुख सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळसाहेब आमले, गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, कुºहेगाव सरपंच भाऊसाहेब धोंगडे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विक्रम पासलकर, विजय नाठे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पाच्या पोटी सरकारने कितीही पैसा दिला तरी तो फक्त काही दिवसांचा सोबती असतो म्हणून आपली मायभूमी सहजासहजी बळी पडून सरकारला देऊ नये, असे आवाहन पंचायत समिती माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी केले, तर विक्रम पासलकर, गणेश मुसळे, बाळासाहेब आमले, गणपत दिवटे, वामन काजळे, राजू रोकडे आदींनी जोरदार विरोध करत शेतकºयांच्या पाठीशी ठाम उभे राहू, असे सांगितले. प्रास्ताविक संपत मुसळे यांनी केले. आभार दत्तू दिवटे यांनी मानले.
या बैठकीस माजी सरपंच मोहन यंदे, संपत मुसळे, पुंडलिक मुसळे, हरिभाऊ गुळवे, दत्तू दिवटे, मोहन करंजकर, बाबू धोंगडे, सुखदेव दिवटे, पोलीसपाटील ज्ञानेश्वर धोंगडे, शिवाजी मुसळे, भाऊसाहेब मुसळे, केशव काजळे, बाळासाहेब यंदे, रवि काजळे, नामदेव धोंगडे, भिवाजी धोंगडे आदींसह शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांना माहितीने नसल्याने अडचणशेतावर माहिती घेण्यासाठी आलेल्या या कामगारांकडून वरिष्ठ पातळीवर कुठलीही माहिती विचारली असता दिली जात नाही. म्हणून पुढील रणनीती ठरविण्यासाठी आज शेतकरी एकत्र आले होते. येत्या गुरु वारी (दि. ६) शेतकºयांचे शिष्टमंडळ खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाधिकारी यांची
भेट घेणार आहे. या बैठकीत नांदूरवैद्यचे सरपंच अॅड. चंद्रसेन रोकडे यांनी कायदेशीर लढा देऊ, असे सांगितले तर गोंदे दुमाला सरपंच शरद सोनवणे यांनी प्रसंगी मोठा लढा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे म्हटले. कुºहेगावचे सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांनी खासदार हेमंत गोडसे व जिल्हाधिकारी सुरज मांढरे, यांच्याकडे शेतकºयांचे शिष्टमंडळ घेऊन जाऊ, असे सांगत शेतकºयांनी संघटित व्हावे, असे सांगितले.