पाइपलाइनला शेतकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:47 PM2019-04-04T23:47:38+5:302019-04-04T23:48:11+5:30
अंदरसूल : जोपर्यंत व्हॅल्युएशनप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा अंदरसूल परिसरातील शेतकऱ्यांनी येवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
अंदरसूल : जोपर्यंत व्हॅल्युएशनप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेचा योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा अंदरसूल परिसरातील शेतकऱ्यांनी येवला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
गुजरातच्या कोयली रिफायनरीतून अहमदनगर सोलापूर येथे पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्यासाठी इंडियन आॅइल कंपनीतर्फे भूमिगत पाइपलाइन टाकली जात असून, यासाठी शेतकºयांच्या शेतजमिनी भूसंपादन केल्या जात आहे. ७५० किमीच्या पाइपलाइन प्रकल्पासाठी सण १९६२ च्या जमीन वापर हक्काबाबत कलम ६ (१) व ४ (२)अन्वये भूसंपादन करण्यासाठी दि. १८ सप्टेंबर २०१७ रोजी नोटीस काढून मनमाड येथील अधिकाºयांच्या कार्यालयातर्फे हरकत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर येवला येथील तहसील कार्यालयात शेतकºयांना बोलावून मनमानी पद्धतीने अर्ज निकाली काढण्यात येऊन जमिनीचा व शेतमाल नुकसानीचा योग्य दर देऊ असे आश्वासन अधिकाºयांनी दिले होते; मात्र इंडियन आॅइल कर्मचाºयांनी पूर्वसूचना न देता काम सुरू केले. शेतकºयांनी सुपीक जमीन निकामी होणार असल्याने त्या जमिनीचा मोबदला किती, त्या क्षेत्रात असणाºया पिकांचा मोबदला किती व कधी देणार? याविषयी विचारणा केली; मात्र संबंधित अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवला तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला.
जमिनीचा व असलेल्या पिकाचा दर सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे शेतकºयांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. भूसंपादन करताना कृषी अधिकारी, तलाठी सुद्धा सोबत नाही, मालमत्तेचा दर किती व कसा आहे हे कोणत्याच शेतकºयांना माहीत नसताना कर्मचारी चुकीची आकडेवारी सांगून शेतकºयांना लुबाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. अशा कर्मचाºयांची त्वरित दखल घेऊन शेतकºयांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी संबंधित अधिकाºयांना सूचित करावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांच्यासह अंदरसूल येथील शेतकरी, पुंडलिक जानराव, अनिल वलटे, महादू पुंड, तुळशीराम मेहतर, सदाशिव सोनवणे, रवींद्र बनकर, अरु ण जगताप, राजेंद्र सोनवणे, बोकटेचे उपसरपंच प्रताप दाभाडे आदींनी तहसीलदार रोहिदास वारूळे यांना निवेदन दिले. एकत्र कुटुंबात कलह होण्याची शक्यता१८ मीटर रु ंद व दीड मीटर खोली केल्यास शेतजमिनीतील मुरूम वरती येऊन सुपीक जमीन तीन ते पाच वर्ष नापीक होणार आहे. त्यामुळे या जमिनीत पिकांचे उत्पादन शून्य होणार आहे. त्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. याशिवाय एकत्र कुटुंबात जमीन वाटपाच्यावेळी या क्षेत्रातून कुटुंबात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय या क्षेत्रात शेतकºयांना घर बांधणे, फळबागा, शेततळे, विहिरी, बोअरवेल घेण्यास शासनाकडून निर्बंध करण्यात आले आहेत.