मका खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:45 PM2020-06-23T22:45:04+5:302020-06-23T22:47:03+5:30
सटाणा : शासनाने अचानक मका खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मंगळवारी (दि. २३) येथील दक्षिण भाग विकास सोसायटीसमोर संतप्त शेतकºयांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने केली.
सटाणा : शासनाने अचानक मका खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मंगळवारी (दि. २३) येथील दक्षिण भाग विकास सोसायटीसमोर संतप्त शेतकºयांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणा देत निदर्शने केली.
शेतकºयांकडून मका खरेदीसाठी शासनाने दक्षिण भाग सोसायटी ही संस्था माध्यम प्रतिनिधी म्हणून नेमली आहे. मका विक्रीसाठी ९९० शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी आतापर्यंत फक्त ९२ शेतकºयांकडून २७९२ क्विंटल मका खरेदी करण्यात आला. दि. २८ मे ते १७ जूनपर्यंत बारदानाअभावी मका खरेदी बंद करण्यात आली होती.
दि.१८ जूनपासून मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात येऊन २० तारखेपर्यंत खरेदी झाली. सोमवारी (दि.२२) संस्थेने मका खरेदी न करण्याचा शासकीय आदेश आल्याचे सांगून अचानक मका खरेदी बंद केली. शनिवारी (दि.२०) टोकन नंबर घेतलेल्या शेतकºयांना २२ तारखेला मका विक्र ीसाठी आणावा, असा संदेश भ्रमणध्वनीवर देण्यात आला होता. त्यामुळे शेतकºयांनी मका खरेदी केंद्रावर ट्रॅक्टर आणले होते, मात्र त्यांचा मका खरेदी न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. शासनाने गाजावाजा करून मका खरेदी केंद्र सुरू केले. मात्र सुरू करण्यापूर्वीच अनेक अडथळे आले. कधी मका ठेवण्यासाठी जागा नाही म्हणून , तर कधी बारदान नाही म्हणून खरेदी बंद करण्याची वेळ आली. आता तर कोटा पूर्ण झाला म्हणून शासनाने खरेदी बंद करण्याचे आदेश दिले. हा सर्व प्रकार म्हणजे शेतकºयांची कुचेष्टा आहे. शासनाने शेतकºयांना दिलासा देण्यासाठी तत्काळ मका खरेदी पुन्हा सुरू करावी.
- दिलीप बोरसे
आमदार, बागलाण