समृद्धी महामार्गाला जागा देण्यासाठी शेतकऱ्यांची रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:59 AM2018-08-29T01:59:13+5:302018-08-29T02:00:41+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदलाचा लाभ मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे.
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदलाचा लाभ मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे. शासनाने यापूर्वीच सक्तीने भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी केली असून, त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. समृद्धीसाठी ८५ टक्के जमिनीचा ताबा शासनाला मिळाला आहे. समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील सुमारे ४९ गावांमध्ये जमिनीची खरेदी करण्यात येत असून, त्यासाठी शासनाने बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊ केला आहे. परंतु सुरुवातीला शेतकºयांनी या महामार्गाला व जमीन देण्यास विरोध केल्याने काहीशा उशिराने जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात झाली होती. परंतु अशा परिस्थितीत जमिनीचा मोबदला चारपटच मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी नुकसान करून घेण्यापेक्षा संमतीने जागा देण्याची तयारी दर्शविली असून, शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार असल्याने तत्पूर्वीच शेतकºयांनी आपापसातील हेवेदावे तसेच न्यायालयीन दावे मागे घेत शासनाला जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. इगतपुरी तालुक्यात शासकीय व खासगी मिळून जवळपास ८५ टक्के संपादन झाले असून, जागा देण्यासाठी दररोज शेतकºयांची रीघ लागत असल्याने आणखी दोन टक्क्याने संपादन वाढण्यास मदत होणार आहे. आजपावेतो जिल्ह्णातील सहा हजार जागामालक शेतकºयांकडून समृद्धीसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून शासनस्तरावर शेतकºयांची समजूत काढून त्यांना जमीन देण्याचे काम सुरू आहे. साधारणत: ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर उर्वरित जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. जे शेतकरी संमतीने जागा देणार नाहीत, त्यांची जागा सक्तीने घेतली जाईल व त्यासाठी निवाडे जाहीर केले जाणार आहेत.