विजेच्या लपंडावामुळे शेतकरी एकवटले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:38 PM2020-10-19T17:38:09+5:302020-10-19T17:39:00+5:30
पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ व द्राक्ष, कांदा, टोमॅटोची प्रसिद्ध आगर म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून तो सुरळीतपणे सुरू करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरण विभागाचे शाखा अभियंता एकनाथ कापसे व निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांना निवेदन देऊन केली आहे.

यावेळी मविप्र चे माजी संचालक दिलीप मोरे, विश्वास मोरे, श्याम मोरे, श्याम जाधव, रवींद्र मोरे, सोमनाथ मोरे, किरण मोरे, अनिल मोरे, विलास कईकर, राजाराम परदेशी, बाळासाहेब बनकर, संजय मोरे, राजेंद्र खोडे, दिलीप दिघे आदी शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे सध्या द्राक्ष छाटणी व टॅमोटो व भाजीपाला हंगाम नुकताच सुरू झाल्याने त्यास औषध फवारणी साठी विजेची नितांत गरज असतांना ती वारंवार खंडित होत असल्याने द्राक्ष छाटणीसह टॅमोटो व भाजीपाला पिकाला मोठा फटका सहन करावा लागेल त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा सुरू करून शेतकऱ्यांसह पिंपळगावच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाविरतण विभागाने लक्ष देत पूर्ण वेळ वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.